Second installment  | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 8-10 दिवसांत आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम रोखीने मिळणार

HomeBreaking Newsपुणे

Second installment | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 8-10 दिवसांत आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम रोखीने मिळणार

Ganesh Kumar Mule Apr 20, 2023 2:26 PM

DA Hike News | 3 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची विशेष बैठक, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येऊ शकतेय मोठी बातमी  – महागाई भत्ता जाहीर होणार का?
DA Hike | केंद्रीय कर्मचारी आता श्रीमंत होणार याची खात्री | 46% महागाई भत्ता होणार हे निश्चित! अपडेट जाणून घ्या
DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आली | महागाई भत्ता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार!  | जाणून घ्या किती वाढेल? 

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 8-10 दिवसांत आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम रोखीने मिळणार

पुणे | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम आधीच मिळाली आहे. आता दुसरा हफ्ता देखील येत्या 8-10 दिवसात मिळणार आहे. याबाबत प्रशासनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. याबाबतचे सर्क्युलर लेखा व वित्त विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना अ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हप्त्याची रक्कम रोखीने अदा करणेस  मान्यता प्राप्त झालेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सेवकवर्ग व सातव्या वेतन आयोगाचा दुसऱ्या हप्त्याच्या खर्चासाठी अपुरी पडणारी रक्कम सन २०२२-२३ अर्थसंकल्पातील
अखर्चित रक्कमेमधून वर्गीकरणाने उपलब्ध करून देणेस  आयुक्त तथा प्रशासक यांची मान्यता प्राप्त झालेली आहे.

| सर्क्युलर मध्ये काय म्हटले आहे?
१. ७ व्या वेतन आयोगानुसार पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची रक्कम रोख स्वरुपात अदा करण्यासाठी संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्वरित प्राप्त करून द्यावी.
2. ७ व्या वेतन आयोगानुसार पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची बिले दि. २६/०४/२०२३ अखेर ऑडीट विभागातून तपासून घ्यावी.
३. तसेच आयकर कपात करण्याबाबत सुविधा संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राप्त करून द्यावी.
४. ६ व्या वेतन आयोगाच्या वेतन आकारणी व वेतन फरक हप्त्यांची ज्याप्रमाणे नोंदी सेवापुस्तकामध्ये करणेत आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे ७ व्या वेतन आयोगापोटी पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना अदा केलेल्या हप्त्याची व पुढील मिळणाऱ्या हप्त्यांची तसेच विवरण पत्रातील वेतना संबंधीची नोंद सेवा पुस्तकामध्ये संबंधीत पगार बिल लेखनिकांनी ठेवणे आवश्यक आहे.