DSK Vishwa | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर

HomeपुणेBreaking News

DSK Vishwa | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर

Ganesh Kumar Mule Apr 10, 2023 1:57 PM

Odisha Train Accident | ओडिशा रेल्वे अपघात | पुणे शहर कॉंग्रेस कडून श्रद्धांजली आणि शोकसभा
Maharashtra Rain Update | आजपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 

डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर

| खासदार सुळेंच्या प्रयत्नांना यश

पुणे : धायरी येथील डिएसके विश्व सोसायटीसाठीसाठी पुणे महापालिकेकडून सहा इंची २०० मीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली असून त्यासाठी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आभार मानले आहेत.

खासदार सुळे यांच्या सूचनेनुसार डीएसके विश्व सोसायटीचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी येथील मेघमल्हार सोसायटीचे चेअरमन शीतल कामते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली आहे. या वाहिनीसाठी निधी देखील मंजूर झाला असून लवकरच येथील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सुळे यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरून माहिती दिली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे आभारही मानले आहेत.