सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड उड्डाणपुलाचे चे भूमिपूजन 24 ला
: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार भूमिपूजन
पुणे: शहरात वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे. त्यात सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड तर नेहमीच रहदारीने गजबजलेले. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावर उड्डाणपूल करणे प्रस्तावित आहे. सिंहगड रोडचा उड्डाणपूल महापालिका करणार आहे. तर कात्रज कोंढवा रोड चा NHAI करणार आहे. या दोन्ही उड्डाणपुलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
: सिंहगड रोड उड्डाणपूल : 118 कोटी
पुणे मनपाचे सन २०२१-२२ चे अंदाजपत्रकानुसार विषयांकित कामाचे र. रु. १३४,७०,९१,४३६/- पूर्वगणनपत्रक तयार करणेत आले असून या कामासाठी अंदाजे र.रु. १३५.०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या कामाकरिता रीतसर जाहिरात देऊन निविदा मागविल्या असता, एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सर्वात कमी दराचे ठेकेदार टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड यांची र. रु. ११८,९६,४९,१७७/- (जी.एस.टी. टेस्टिंग चार्जेस व रॉयल्टी वगळून) ची निविदा प्राप्त झाली आहे. ठेकेदार टी अँड टी इन्फ्रा chuemiAdmispowrional- madhyavatm4x7
लिमिटेड यांनी त्यांचा निविदा दर ०.५% ने कमी (र.रु.११८,३७,००,९३१/-) करत असलेबाबत दि. ०२/०८/२०२१ रोजीचे पत्रान्वये कळविले आहे व त्यानुसार ठेकेदार यांची निविदा स्थायी समिती अन्वये मान्य झाली आहे. अद्याप ठेकेदारास कार्यादेश देण्यात आलेला नाही.
लिमिटेड यांनी त्यांचा निविदा दर ०.५% ने कमी (र.रु.११८,३७,००,९३१/-) करत असलेबाबत दि. ०२/०८/२०२१ रोजीचे पत्रान्वये कळविले आहे व त्यानुसार ठेकेदार यांची निविदा स्थायी समिती अन्वये मान्य झाली आहे. अद्याप ठेकेदारास कार्यादेश देण्यात आलेला नाही.
प्रस्तुत कामामुळे होणारे फायदे –
१) २.७४ किमी. ची वाहतूक थेट होणार असल्याने वेळेची व इंधनाची बचत होणार आहे.२) सिंहगड रोड परिसरातील खडकवासला, नांदेड सिटी, नन्हे, धायरी या गावांमधील झपाट्याने होत असलेला विकास व सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्ता उपलब्ध नसणे या बाबी विचारात घेता भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने फायदेशीर.३) इनामदार चौक, ब्रम्हा हॉटेल चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल चौक व फन टाईम सिनेमा चौकात उजवी व डावीकडे वळणाऱ्या स्थानिक वाहतुकीसाठी फायदेशीर. ४) वडगाव, खडकवासला, नहे व नॅशनल हायवे वरून कात्रज – पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त होणार आहे.
: कात्रज कोंढवा रोड : 169.15 कोटी
किमी येथे कात्रज जंक्शनवर सिक्स लेन फ्लायओव्हरचे बांधकाम. NH-548DD चे 3/880 (वडगाव-कात्रज-कोंढवा-मंतरवाडी चौक-लोणी काळभोर- थेऊर फाटा-लोणीकंद रोड) महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील
अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम विभाग: वंडर सिटी सोसायटी ते पेट्रोल पंपापर्यंत पुण्यातील राजस सोसायटी जवळ महाराष्ट्र राज्यातील जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत काम मंजूर झाले आहे. कामाची निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.
निविदा रु. 141.10 कोटी . सर्वात कमी बोलीदार DMR बिल्डर्स प्रा. लि., भटिंडा, पंजाब ‘साठी रु. 104.97 कोटी (25.59 % कमी दराने)B Tender निविदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता आणि प्रादेशिक अधिकारी यांना पाठविला जातो, MoRT & h, नवी मुंबई.
LoA जारी करणे आणि काम सुरू करण्यासाठी नियुक्त तारीख प्रगतीपथावर आहे.
ईपीसी कंत्राटदाराने प्राथमिक जमीन सर्वेक्षण सुरू केले आहे.
या दोन्ही उड्डाणपुलाच्या कामासाठी आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेहमीच पाठपुरावा केला. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी केली. त्यामुळे हे दोन्ही विषय पुढे जाऊ शकले. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत वारंवार बैठका घेऊन प्रशासनाला निर्देश दिले होते. मात्र नेहमीच क्रेडिट घ्यायला पुढे असणाऱ्या भाजपाला मात्र याचे श्रेय या दोघांना द्यावेसे वाटले नाही. आमचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र भाजपच्या अशा मानसिकतेचा आम्ही निषेध करतो.
COMMENTS