Water Closure | येत्या बुधवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद | गुरुवारी कमी दाबाने पाणी

HomeपुणेBreaking News

Water Closure | येत्या बुधवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद | गुरुवारी कमी दाबाने पाणी

Ganesh Kumar Mule Feb 24, 2023 12:40 PM

Buddha Purnima | बौद्ध जयंतीनिमित्‍त शहीद जवानांच्‍या कुटुंबियांसाठी एक लाखांचा धनादेश सुपुर्त | डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि मित्र परिवाराचा उपक्रम
PMPML | रिक्षा आंदोलनाचा पीएमपीला फायदा | ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा
Pune Shivsena UBT | पब संस्कृती विरोधात शिवसेनेचा (UBT) एल्गार

येत्या बुधवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद | गुरुवारी कमी दाबाने पाणी

पुणे शहरामधील एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार
असल्याने बुधवार दि. ०१.०३.२०२३ रोजी पुणे शहरातील खालील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक ०२.०३.२०२३ रोजी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) :- प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, कर्वे रोड, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयूर कॉलनी, डेक्कन परिसर, कोथरूड, संगम प्रेस रोड, करिष्मा सोसायटी, हॅपी कॉलनी, सहवास सोसायटी,
कर्वेनगर परिसर, म्हात्रे पूल ते राजाराम पूल, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी, कर्वे पुतळा परिसर, आयडियल कॉलनी परिसर पौड रोड, भांडारकर रोड, एसएनडीटी परिसर इ.