Merged 23 villeges : जाहिरात फलकाबाबत महापालिका आयुक्तांनी काढले हे आदेश

HomeपुणेPMC

Merged 23 villeges : जाहिरात फलकाबाबत महापालिका आयुक्तांनी काढले हे आदेश

Ganesh Kumar Mule Sep 20, 2021 7:49 AM

PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या  | बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम 
Pune former Mayor Rajni Tribhuvan, who used to treat everyone with respect and called him “Tai, Dada” passed away!
PMC Garden Department | पुणे महापालिकेचे 42 वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 10 आणि 11 फेब्रुवारीला!

समाविष्ट 23 गावातील जाहिरात फलकांना घ्यावी लागणार परवानगी

: 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे उद्देश

पुणे: राज्य सरकारने महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश केला आहे. त्यानुसार गावे ताब्यात घेण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाने पूर्ण केली आहे. शिवाय तिथे सुविधा देण्याचे काम सुरु आहे. मात्र गावातील जाहिरात फलक, दुकानावरील नामफलक, मशिनरी व साठा परवाना व्यवसायासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. परवानगी न घेतल्यास कारवाई करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत.

: 23 गावांचा समावेश

महाराष्ट्र शासनाकडील दि. ३०.०६.२०२१ रोजीच्या अधिसूचनेनुमार म्हाळुगे, सूस, बावधन-बुद्रुक,किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकबामला, मांजरी-बुद्रुक, न-हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मणमनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली अशा तेवीस तत्कालीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ठ करण्यात आले आहे. या  ग्रामपंचायतीचे हद्दीत सुरू असलेल्या तमेच नव्याने सुरू करण्यात येणा-या जाहिरात फलक, दुकानावरील नामफलक व्यवसायांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २ ८४, ८५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ चे तरतुदीनुसार तसेच मशिनरी व साठा परवाना व्यवसायांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३१३ व ३७६ नुमार तरतुदी लागू होत आहेत. त्याकरीता सदर ब्यवसायांना पुणे महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील जाहिरात फलक, दुकानावरील नामफलक, मशिनरी व माठा परवाना व्यवसायाचे सर्वेक्षण करून सर्व संबंधीतांना  नोटीम बजावण्यात यावी व परवानगी बाबतचे प्रस्ताव दि.२०.१०.२०२१ अखेर जमा करून परवानगी व शुल्क आकारणीची कार्यवाही करण्यात यावी. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

: परवानगी न घेणाऱ्यांवर कारवाई

आयुक्तांनी पुढे आदेशात म्हटले आहे की, विहित  मुदतीत प्रस्ताव सादर न केलेले नियमबाहय/ अनधिकृत जाहिरात फलक, नामफलक, मशिनरीअनधिकृत जाहिरात फलक, नामफलक, मशिनरी व साठा परवाना व्यवसायावर  नियमानुसार कारवाई करण्यात यावी. शिवाय सर्व संबंधीत महापालिका सहायक आयुक्त्, क्षेत्रिय कार्यालयाकडील कार्यवाहीचा सविस्तर अहवाल  उप आयुक्त, परिमंडळ क्र. १ ते ५ यांनी उप आयुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग यांचेमार्फत आमचे कडे सादर करावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0