वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी!
| प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप
पुणे | महापालिकेकडून वारजे येथे करोडो रुपये खर्चून हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. मात्र हे प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. तसेच हा विषय दफ्तरी दाखल करावा. अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी ही मागणी केली आहे. केसकर यांच्या निवेदनानुसार पुणे येथे वारजे ठिकाणी बांधा, डिझाईन करा, हस्तांतरित करा या तत्वावर हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. मात्र या बाबत प्रकल्पाला एकट्याने दिलेली मान्यता त्वरित रद्द करावी. हे संपूर्ण प्रकरण बेकायदेशीर आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक हिताच्या विरोधात आहे. राज्य सरकारने कुठलाही विचार न करता आणि स्वतःवर कुठलीही आर्थिक तोशिश घेणार नाही, अशा प्रकारची मान्यता दिली आहे. जी मान्यता तुम्ही मागितली नाही ती देखील मान्यता त दिली आहे. अशा परिस्थितीत आपण हे प्रकरण दप्तरी दाखल करावे. असे ही केसकर म्हणाले.