Maharaktadan camp | महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान 

HomeBreaking Newsपुणे

Maharaktadan camp | महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान 

Ganesh Kumar Mule Feb 09, 2023 3:25 PM

Blood Donation Camp | दाभोलकरांच्या बलिदान दिनानिमित्त ६२ जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम
Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम
Sunny Nimhan | blood donation camp | मा. नगरसेवक सनी निम्हण आयोजीत रक्तदान शिबिरात विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान

पुणे |. राज्यशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार तसेच डॉ. तानाजी सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात  ९ फेब्रुवारी रोजी ‘महारक्तदान शिबिर’ मोहिमे अंतर्गत एकूण १३ आरोग्य संस्थामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ३५८ पुरुष व ११२ स्त्रिया असे एकूण ४७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. (pmc pune)
 पुणे महानगरपालिका भवन येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी
अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार, आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, मा. खातेप्रमुख व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये एकूण ६६ अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. (pune municipal corporation)
पुणे महानगरपालिका अधिनस्त १५ आरोग्य संस्थामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन स्थानिक लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर शिबिरामध्ये एकूण २,०५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली (पुरुष :- ९०० व स्त्रिया १,१५३) व त्या पैकी १,१८० (पुरुष :- ५५७ व स्त्रिया ६२३) रुग्णांवर उपचार करण्यात आले व एकूण १७ (पुरुष :- ०५ व स्त्रिया १२) रुग्णांना पुढील उपचारार्थ संदर्भित करण्यात आले.
“जागरूक पालक सुदृढ बालक” या अभियानाचे उदघाटन सिग्नेट पब्लिक स्कूल हांडेवाडी रोड येथे  उल्हास तुपे यांचे शुभहस्ते व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे उपस्थितीत झाले. त्यावेळी  योगेश ससाणे (माजी सभासद पुणे मनपा) व  अविनाश काळे (माजी सभासद पुणे मनपा) उपस्थित होते. सदर अभियानांतर्गत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ७,३३३ विद्यार्थी यांची तपासणी करण्यात आली व त्या पैकी १०५ विद्यार्थी यांच्यावर उपचार करण्यात आले व एकूण ४२६ विद्यार्थी यांना पुढील उपचारार्थ संदर्भित करण्यात आले.