Contract Employees | PMC pune | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत

HomeपुणेBreaking News

Contract Employees | PMC pune | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत

Ganesh Kumar Mule Dec 22, 2022 4:41 AM

Contract Employers-: कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा ! | मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
Security guards | contract workers | मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे
Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 

पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत

| कामगारांच्या भवितव्यावरून आ. चेतन विठ्ठल तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट केला सवाल

विधिमंडळात पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेतांना हडपसरचे दमदार आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील (MLA chetan tupe) यांनी पुणे महानगरपालिकेतील (PMC pune) कंत्राटी कामगारांचा (contract employees) मुद्दा उपस्थित केला. पुणे मनपाने मागील १५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या २०० सुरक्षारक्षकांना (security guards) अचानक कामावरून कमी केले आहे. यासाठी दिलेले कारणही न पटण्याजोगे आहे. ५८ किंवा ६० वर्षे निवृत्तीचे वय असताना ४५ वर्षे वयाची अट दाखवत या कामगारांना कामावरून कमी केले आहे. यावर त्यांनी विधानसभेत सवाल उपस्थित केला. (Vidhansabha)
अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कंत्राटी कामगार काम करत असून यात अनेक महिला भगिनींचा समावेश आहे. यातील अनेकजणी विधवा, परितक्त्या असून नोकरी गेल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महानरपालिकेत हे घडते आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा सन्मान करण्याची, त्यांना हक्क मिळवून देण्याची वक्तव्ये सत्ताधाऱ्यांकडून फक्त तोंडदेखली केली जातात का अशी खोचक टीकाही त्यांनी केली.  याबाबत काय कार्यवाही करण्यात येईल हे मा.मुख्यमंत्री महोदयांनी अवगत करावे अशी मागणी आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी केली आहे.