PMC Retired Employee | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम तत्काळ न दिल्यास विभागप्रमुख जबाबदार | आयुक्तांकडे केली जाणार तक्रार  | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा सर्व विभाग प्रमुखांना इशारा

HomeपुणेBreaking News

PMC Retired Employee | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम तत्काळ न दिल्यास विभागप्रमुख जबाबदार | आयुक्तांकडे केली जाणार तक्रार | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा सर्व विभाग प्रमुखांना इशारा

Ganesh Kumar Mule Dec 12, 2022 1:23 PM

7th Pay Commission | PMC Pune Employees | सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आदेश
7th Pay Commission | PMC Education Department | शिक्षण विभागातील 435 सेवानिवृत्त सेवकांना अखेर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरक आणि पेन्शन
PMC Retired Employees | सेवानिवृत्त सेवकांच्या सुधारित वेतनाचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल | सेवानिवृत्त सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम तत्काळ न दिल्यास विभागप्रमुख जबाबदार | आयुक्तांकडे केली जाणार तक्रार

| मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा सर्व विभाग प्रमुखांना इशारा

पुणे | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना (PMC Retired Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) अजूनही फरकाची रक्कम देण्यात आलेली नाही. याबाबत वारंवार आदेश देण्यात आले होते. तरीही ही बाब गंभीरपणे घेण्यात आलेली नाही. याबाबत मनपा सेवानिवृत्त सेवक संघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात ज्या खात्यांचे फरकांच्या बिलाचे कामकाज प्रलंबित राहिल्यास व त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यास संबंधित विभागाचे खातेप्रमुख (HOD) जबाबदार राहतील. तसेच ही बाब  प्रशासक व आयुक्त (PMC Commissioner/ Administrator) यांचे निदर्शनास आणून देण्यात येईल. असा इशारा मुख्य व लेखा अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिला आहे. (Pune Municipal corporation)

| मुख्य व लेखा अधिकाऱ्यांचे असे आहेत आदेश

दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीमध्ये मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत झालेल्या सर्व मनपा अधिकारी/कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाच्या फरकाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), पुणे मनपा यांचे कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये आदेश देण्यात आले होते. (PMC Pune)

पुणे मनपाच्या संबंधित सर्व खात्याच्या बिल क्लार्क यांनी त्यांचे संबधित खात्याकडील दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीत सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत्त झालेल्या सर्व मनपा अधिकारी / कर्मचारी यांचे सुधारित वेतनाच्या फरकाच्या बिलांबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (Version) पुणे मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करून घेऊन त्याप्रमाणे बिले तयार करावयाची आहेत. तसेच सदरची बिले सातव्या वेतन आयोग समितीकडून तपासून घेऊन त्याबाबतच्या सर्व अंतिम नोंदी सेवानिवृत्त सेवकांचे सेवापुस्तकात करणेबाबत त्याचप्रमाणे मुख्य लेखापरीक्षक विभागाने सूचित केल्यानुसार संबधित सेवानिवृत्त सेवकांचे सेवापुस्तकात सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा केल्याबाबतची नोंद घेऊन तसेच सुधारित बेसिकप्रमाणे पेन्शन आकारणी करून अशी पेन्शन प्रकरणे निवृत्तीवेतन विभागाकडे त्वरित पाठविणेबाबत व सेवानिवृत्त सेवकांना
सुधारित वेतनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करण्याचे काम दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत पूर्ण होईल, याबाबतची दक्षता घेणेबाबत वरील संदर्भाकित कार्यालयीन परिपत्रकान्वये मनपाच्या सर्व मा. खातेप्रमुख यांना सूचित करणेत आले होते.  (7th pay commission)

तथापि, अद्यापही बहुतांशी खात्यांनी वरील कार्यालयीन परिपत्रकानुसार कामकाज केलेले नसल्याने याबाबत पुणे मनपा सेवानिवृत्त सेवक संघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुणे मनपा सेवानिवृत सेवकांमध्ये यामुळे असंतोष पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी, दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीत सेवानिवृत / ऐच्छिक सेवानिवृत झालेल्या सर्व मनपा अधिकारी / कर्मचारी यांचे सुधारित वेतनाच्या फरकाच्या बिलांबाबतची आवश्यक ते कामकाज सत्वर पूर्ण करण्याची दक्षता घेणेबाबत या स्मरणपत्राद्वारे पुन्हा कळविण्यात येत आहे. या स्मरणपत्राद्वारे कळवूनही ज्या खात्यांचे फरकांच्या बिलाचे कामकाज प्रलंबित राहिल्यास व त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यास संबंधित विभागाचे खातेप्रमुख जबाबदार राहतील व सदरची बाब मा. प्रशासक व आयुक्त, पुणे मनपा यांचे निदर्शनास आणून देण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.  (PMC Commissioner/Administrator)