7th Pay Commission | सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत 

HomeपुणेBreaking News

7th Pay Commission | सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत 

Ganesh Kumar Mule Oct 06, 2022 2:19 AM

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव
Pune Municipal Corporation Retired Sevak Sangh | मागण्यांवर अंमल करा अन्यथा 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन .!  | पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचा मनपा प्रशासनाला इशारा 
PMC HRA Circular | पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी! 

सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत

| महापालिका कर्मचारी त्रस्त | नेमकं कोण अडवणूक करतंय?

| 7 व्या वेतन आयोगातील पहिल्या हफ्त्याची रक्कम कधी मिळणार?

 

पुणे |  महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. यामुळे प्रशासनाची आलोचना केली जात आहे. खरे पाहता नियमानुसार ही रक्कम जून महिन्यात मिळणे अपेक्षित होते. जून महिन्यापासून महापालिका प्रशासन याची तयारी करत आहे, तरीही अजून 100 बिले देखील तयार झाली नाहीत. असे सांगितले जाते कि संगणक विभाग आणि लेखा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने हा उशीर होत आहे. मात्र प्रशासनातील वादामुळे कर्मचारी परेशान होत आहे, याकडे कधी लक्ष जाणार आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम अदा करणे बाबतची संगणक प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली आहे. आता  संगणक प्रणालीचा वापर करून पहिल्या हफ्त्याची रक्कम अदा केली जाणार आहे. त्यानुसार लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक बाकी होते. विभागाने ऑगस्ट महिन्यात हे पत्रक जारी केले. 5 ऑगस्ट पर्यंत ही बिले तपासून घेण्याचे आदेश लेखा विभागाने सर्व विभागांना दिले होते. यामध्ये शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाची आलोचना केली जात होती. शिवाय महापालिका कर्मचारी देखील त्रस्त झाले आहेत. याबाबत  संगणक विभागाकडे बोट दाखवले जात होते. मात्र आता संगणक आणि ऑडीट विभाग यांच्यात समन्वय नाही, असे बोलले जात आहे. खरे पाहता नियमानुसार ही रक्कम जून महिन्यात मिळणे अपेक्षित होते. जून महिन्यापासून महापालिका प्रशासन याची तयारी करत आहे, तरीही अजून 100 बिले देखील तयार झाली नाहीत. असे सांगितले जाते कि संगणक विभाग आणि लेखा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने हा उशीर होत आहे. मात्र प्रशासनातील वादामुळे कर्मचारी परेशान होत आहे, याकडे कधी लक्ष जाणार आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात दिवाळी बोनस, उचल रक्कम द्यायची आहे. त्याचा बोज असणारच आहे. त्यात फरकाची रक्कम देण्यासाठी प्रयत्न होणार का? तसा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करत आहेत.

पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हम्याची रक्कम दर वर्षी जून महिन्याच्या मासिक वेतन देयकाबरोबर माहे जुलै मध्ये रोखीने अदा करणेबाबत लेखा विभागाकडून अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचेमार्फत  महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदन सादर केले होते. त्यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “एकूण कर्मचारी संख्या व आवश्यक निधी बाबत विचारणा केलेली होती. त्यानुसार लेखा विभागाने संगणक विभागाकडे याबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार संगणक विभागाने याबाबतची संगणक प्रणाली अद्ययावत केली आहे. आता सर्व जबाबदारी ही लेखा व वित्त विभागाची होती. लेखा विभागाचे परिपत्रक आल्यानंतर बिले काढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रक्कम मिळणार आहे. मात्र आता फार उशीर न लावता ही रक्कम लवकर मिळावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करत होते. त्यानुसार हे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र 4 महिने उलटूनही ही रक्कम मिळालेली नाही.