7th Pay Commission | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम अजूनही मिळेना  | 30 नोव्हेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश 

HomeपुणेBreaking News

7th Pay Commission | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम अजूनही मिळेना  | 30 नोव्हेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 19, 2022 12:46 PM

7th pay commission : Difference in pay : वेतन आयोग फरकावर आयुक्तांकडून मार्गदर्शन होईना!   : अंदाजपत्रकातील शिल्लक रकमेचा मेळ लागेना 
7th Pay Commission | सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत 
PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार

7th Pay Commission | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम अजूनही मिळेना

| 30 नोव्हेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश

१.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीमध्ये मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत्त (PMC Retired employees) झालेल्या सर्व मनपा अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) सुधारित वेतनाच्या फरकाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), (PMC additional commissioner) यांचे कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये आदेश देण्यात आले होते. तसेच सदरच्या फरकाच्या रकमांची बिले माहे ऑक्टोबर, २०२२ पूर्वी तयार करणेबाबतही या बैठकीमध्ये सूचित करण्यात आले होते. अद्यापही सदरच्या बिलांचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. 30 नोव्हेंबर पर्यंत बिले तयार करून रक्कम अदा करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सर्व खात्यांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation)
मुख्य लेखा व वित्त अधिकारी  यांच्या आदेशानुसार पुणे मनपाच्या संबंधित सर्व खात्याच्या बिल क्लार्क यांनी त्यांचे संबधित खात्याकडील दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीत सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत्त झालेल्या सर्व मनपा अधिकारी / कर्मचारी यांचे सुधारित वेतनाच्या फरकाच्या बिलांबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (Version) पुणे मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करून घेऊन त्याप्रमाणे बिले तयार करावयाची आहेत. तसेच सदरची बिले सातव्या वेतन आयोग समितीकडून तपासून घेऊन त्याबाबतच्या सर्व अंतिम नोंदी सेवानिवृत्त सेवकांचे सेवापुस्तकात करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य लेखापरीक्षक विभागाने सूचित केल्यानुसार संबधित सेवानिवृत्त सेवकांचे सेवापुस्तकात सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा केल्याबाबतची नोंद घेऊन तसेच सुधारित बेसिकप्रमाणे पेन्शन आकारणी करून अशी पेन्शन प्रकरणे निवृत्तीवेतन विभागाकडे त्वरित पाठवावयाची आहेत. (Pension)
दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१०.२०२१ या कालावधीमध्ये मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत्त झालेल्या सर्व मनपा अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार आदा करावयाच्या सुधारित वेतनाच्या फरकाची बिले दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत तयार करावयाची असून त्यानुसार होणाऱ्या एकूण ५ हप्त्यांपैंकी पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करण्यात येणार आहे. तरी, सर्व संबंधित मा. खातेप्रमुख यांनी त्यांचे अधिपत्याखाली असणाऱ्या मुख्य व उप विभागांच्या पगार बिल क्लार्क यांचेकडून वरील कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या मनपा अधिकारी/सेवक यांना सुधारित वेतनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आदा करण्याचे काम दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत पूर्ण होईल, याबाबतची दक्षता घ्यावी. असे आदेश सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिले आहेत. (PMC Pune)