बार्शी तालुक्यासाठी २ कोटी, १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर
: आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती
बार्शी : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२० – २१ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून २ कोटी १ लाख रूपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
: या गावांना होणार लाभ
या योजनेचा लाभ तालुक्यातील खांडवी, घाणेगांव, सर्जापूर, आगळगांव, उपळाई ठो. झरेगांव, कव्हे, पानगांव, तांबेवाडी, देवगांव, लाडोळे, महागांव, मांडेगांव, रुई, साकत, बावी आ. पिंपरी पा. खडकोणी, मळेगांव, चारे, श्रीपत पिंपरी, धोत्रे, शेंद्री, जामगाव पा. निंबळक आदी या गावांतील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.
COMMENTS