येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू
: १० कामगार गंभीर जखमी
पुणे: येरवडा येथील शास्त्रीनगर(Shastrinagar) येथील गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला(slab collapse) असून त्यात किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
शास्त्रीनगर चौक, वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु होते. रात्री ११ वाजता हा सांगाडा अचानक कोसळला. त्याखाली तेथे काम करीत असलेल्या जवळपास १० कामगार खाली दबले गेले. अग्निशामक दलाला(fire bigrade) या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करुन हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथून १० कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात(sasoon hospital) पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS