Sanitation | बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या  स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!

HomeBreaking Newsपुणे

Sanitation | बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!

Ganesh Kumar Mule Jan 23, 2023 2:50 PM

Women Self Help Group | महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय | ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
PMC Pune | पुणे महापालिका वर्धापनदिन विशेष | पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!
7th Pay Commission | सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत 

बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या  स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!

| घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून सामग्री खरेदीबाबत शहनिशा झालीच नाही

पुणे | महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) केली जात असलेली खरेदी आणि विविध टेंडर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. अशाच एका खरेदीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. बंद असलेला महापौर बंगला (Mayor Bungalow) आणि आयुक्त बंगल्याच्या (PMC Commissioner Bungalow)  स्वच्छतेसाठी 25 लाखाची सामग्री खरेदी करण्यात आली आहे. कल्पक इंटरप्रायजेस (Kalpak Enterprises) या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शहनिशा न करताच या सामग्रीची भांडार विभागाकडून खरेदी करून घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या बजेट हेड (Budget head) च्या माध्यमातून ही रक्कम वापरण्यात आली आहे. ती वापरणे अपेक्षित नसताना क्षेत्रीय कार्यालयाने हा प्रताप केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडून याची चौकशी केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (PMC Pune)
महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याची स्वच्छता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते. त्यासाठी भांडार विभागाकडून विविध सामग्रीची खरेदी केली जाते. महापौर बंगला जो मागील वर्षांपासून बंद आहे आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 2022-23 या सालासाठी स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध 30 साहित्याचा समावेश आहे. ज्यामध्ये सुगंधी तेल, ब्लॅक फिनेल, डांबर गोळी, फ्लोअर क्लिनर, कमोड घासण्याचा ब्रश, काच पुसण्याची नॅपकिन, चहाचा कप, चहा ट्रे, रूम फ्रेशनर, अशी विविध साहित्ये आहेत. ही खरेदी भांडार विभागाकडून करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार भांडार विभागाने टेंडर प्रक्रिया राबवत ही खरेदी केली. कल्पक इंटरप्रायजेस या कंपनीला हे काम देण्यात आले. ज्यासाठी 24 लाख 59 हजाराचा खर्च करण्यात आला आहे. (mayor’s bungalow and the commissioner’s bungalow)
बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च येऊ शकतो का, यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.  कारण गेल्या वर्षांपासून महापौर बंगल्यात कुणी राहत नाही. विशेष म्हणजे ज्या बजेट हेड च्या माध्यमातून ही रक्कम वापरण्यात आली आहे. ती वापरणे अपेक्षित नसताना क्षेत्रीय कार्यालयाने हा प्रताप केला आहे. कोठी अधिकारी साठी 10 कोटी प्रस्तावित करण्यात आले होते. ज्यातून फक्त स्टेशनरी ची खरेदी करणे अपेक्षित होते. असे असताना यातील 25 लाख रुपये स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यासाठी लॉकिंग करण्यात आले आहेत. तसेच हा खर्च 25 लाखाच्या खाली म्हणजे 24 लाख 59 हजार इतका असल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर देखील आला नाही. त्यामुळे याची फारशी चर्चा झाली नाही. कदाचित क्षेत्रीय कार्यालयाला हेच अपेक्षित असावे. (Pune Municipal corporation)
 खरे म्हणजे ही खरेदी करण्याअगोदर क्षेत्रीय कार्यालयाने इतक्या रकमेची शहनिशा करणे अपेक्षित होते. त्यासाठी आधी घनकचरा विभागाकडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे होते. जेणेकरून घनकचरा विभागाने वित्तीय समिती अथवा पर्चेस कमिटीची मान्यता घेतली असती. मात्र हा प्रस्ताव परस्पर भांडार विभागाकडे पाठवण्यात आला. आमच्याकडे हा प्रस्ताव आलाच नाही, असे घनकचरा विभागांने सांगितले तर भांडार विभागाने सांगितले कि शहनिशा करण्याचे काम आमचे नाही. खाते किंवा वॉर्ड ऑफिसच्या मागणीनुसार आम्ही खरेदी करून देतो. यामधून मात्र महापालिकेचे नुकसान झाल्याचे सिद्ध होत आहे. याची महापालिका आयुक्तांकडून चौकशी केली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. (Ghole Road ward office)