सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी 10 कोटींचे वर्गीकरण
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाईम थिअटर पर्यंत उड्डाणपूल बांधणे या कामासाठी कमी पडणारी दहा कोटी ची रक्कम वर्गीकरण च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडून स्थायी समिती कडे करण्यात आली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागामार्फत सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाईम थिअटर
पर्यंत उड्डाणपूल बांधणेत येत आहे. याकामी स्थायी समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार ठेकेदार मे. टी & टी इन्फ्रा लि. यांना कार्यादेश निर्गमित करणेत आलेला आहे. त्यांचेमार्फत प्रत्यक्ष जागेवर काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत उड्डाणपुलाचे एकूण ७१ फुटिंगपैकी ४६ फुटिंग पूर्ण झालेले असून ४४ पिअर पूर्ण झालेले आहेत. तसेच २६ पिअर कॅप पूर्ण झालेल्या असून उर्वरित पिअर कॅप प्रगतीपथावर आहेत. ठेकेदार यांचेमार्फत संतोष हॉल चौक ते ब्रम्हा हॉटेल चौक या दरम्यान १३ बॉक्स गर्डरचे यु- गर्डर पूर्ण झाले असून ६ यु- गर्डरचे काम सुरु आहे.
२०२३ पर्यंत विषयांकित कामासाठी एकूण १४.०० कोटीची आवश्यकता आहे. त्यापैकी. ३.८९ कोटी खात्याकडे उपलब्ध असून कामासाठी अतिरिक्त र. रु. १४.०० कोटीचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.
मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागाकडे नळस्टॉप चौकात वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय करणेककामी उड्डाणपूल बांधणे हे काम महा मेट्रो विभागामार्फत करण्यात आलेले आहे. या कामासाठी उपलब्ध तरतूद ५०.०० कोटी असून त्यापैकी २०.०० कोटी साठी मा. वित्तीय समिती यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे उर्वरित र.रु. ३०.०० कोटी ही रक्कम चालू वर्षात शिल्लक राहणार आहे. त्यानुसार अखर्चित राहणाऱ्या तरतुदी मधून तक्ता १०,००,००,००,००/- (दहा कोटी रुपये) इतकी तरतूद वर्गीकरण करणे शक्य आहे व त्यास खात्याची शिफारस आहे.