सुस-म्हाळुंगे गावातील सार्वजनिक हिताच्या आरक्षणाबाबत विचार केला जाईल
: ग्रामस्थांना नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी दिला विश्वास
पुणे. पीएमआरडी ने नुकताच पुणे जिल्ह्यातील त्यांच्या अधिकारातील गावांमधील प्रारूप आराखडा जाहीर केला. यामध्ये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सुस- म्हाळुंगे गावासह इतर २१ गावांचा देखील समावेश आहे . नागरीकांचा समन्वय साधण्यासाठी आराखड्यात दर्शविलेल्या आरक्षणा बाबत सविस्तर मार्गदर्शन पीएमआरडी चे रचनाकार शामराव चव्हाण , नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक , प्लॅनर आकाश म्हेत्रे यांनी सुस ग्रामस्थांची भैरवनाथ मंदिरामध्ये ज्यांच्या जागेवर आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे अश्या नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिकांना विश्वास दिला गेला की सुस- म्हाळुंगे गावातील सार्वजनिक हिताच्या आरक्षणाबाबत विचार केला जाईल.
– नागरिकांनी मांडल्या समस्या
यावेळी नागरिकांनी सार्वजनिक समस्या सह वैयक्तिक अडी-अडचणी मांडल्या. रामदास ससार हे स्वतः गव्हर्मेंट ऑडिटर असल्याने त्यांनी ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक आरक्षणे, चुकीच्या पद्धतीने दर्शविलेले आरक्षणे, नागरिकांच्या घरावरून गेलेल्या रस्त्याचे आरक्षण असे मुद्देसुर मांडणी केली. तसेच लक्ष्मण चांदेरे यांनी प्रसिद्ध झालेल्या डीपी मध्ये काही सर्व्हे नंबर दर्शविण्यात आलेले नाहीत, याबाबत सांगितले. त्याचप्रमाणे गोपी चांदेरे यांनी सांगितले सर्वे नंबर १७६, १७७ यामध्ये रिंग रोड संदर्भामध्ये मागणी केली. त्याच बरोबर सुस गावात काही ठिकाणी डोंगरावर आर झोन झाला आणि सपाट जागेवर ग्रीन झोन किंवा शेती झोन दाखविण्यात आला तर त्या ठिकाणी आर झोन झाला तर बरं राहील, अशी मागणी केली.
प्रारूप आराखड्याचे स्वागत – चांदेरे
यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी असे सूचित केले की सदरचा पीएमआरडी ने प्रारूप आराखडा जाहीर केला त्याचे मनापासून स्वागत केले. कारण समाविष्ट गावातील प्रतिनिधित्व १५ वर्षापासून करत असताना बाणेर- बालेवाडी या गावांचा सन १९९७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला परंतु तब्बल १३ वर्षांनी आमचा पार्ट डीपी मंजूर झाला. तदनंतर २ वर्षांनी आमच्या गावातील डीपीला मान्यता मिळाली. ही वेळ नवीन समाविष्ट गावांवर येऊ नये म्हणूनच राज्य सरकारच्या संमतीने पीएमआरडी ने जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्याचे मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून देतो की सुस व म्हाळुंगे या दोन गावातील सार्वजनिक हिताची उदा. स्मशानभूमी , पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या टाक्या, घनकचरा प्रकल्प, जल शुद्धीकरण केंद्र, मैला शुद्धीकरण केंद्र किंवा एसटीपी प्लॅन असे महत्त्वाचे आरक्षणे आपण पुणे महानगरपालिके मार्फत सर्व्हे करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीएमआरडी ला सूचना कराव्यात.
या बैठकीला पीएमआरडी चे नगर रचनाकार शामराव चव्हाण, नगर रचनाकार भाग्यश्री ढवळसंक, प्लॅनर आकाश म्हेत्रे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुनील चांदेरे, रामदास ससार, सुहास भोते, नितीन चांदेरे, गोवर्धन बांदल, गणेश सुतार, गणपत चांदेरे, सचिन चांदेरे, दशरथ साळुंखे, पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे, लक्ष्मण चांदेरे, युवराज चांदेरे, नामदेव चांदेरे, रोहिदास भोते, दत्तात्रय चांदेरे, सुखदेव चांदेरे, गोपीनाथ चांदेरे, कृष्णाजी चांदेरे, सोमनाथ चांदेरे, बाळासाहेब निकाळजे, संदीप राम चांदेरे, साहेबराव चांदेरे, अमित भांबरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
COMMENTS