विकासकामांना निधी देऊनही उदघाटनाला बोलावले जात नाही   : आमदार, खासदार महापालिका प्रशासनावर नाराज   : जिल्हा नियोजन कार्यालयाकडे नाराजी व्यक्त

HomeपुणेPMC

विकासकामांना निधी देऊनही उदघाटनाला बोलावले जात नाही : आमदार, खासदार महापालिका प्रशासनावर नाराज : जिल्हा नियोजन कार्यालयाकडे नाराजी व्यक्त

Ganesh Kumar Mule Sep 13, 2021 5:48 AM

Prevent accidents : रहदारीच्या चौकातील अपघात रोखणार महापालिका  : पायलट प्रोजेक्ट वर काम सुरु 
NCP vs BJP : PMC : महापालिकेत राष्ट्रवादीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन 
Pune Municipal Corporation Tax Due Details | 1 कोटींपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या फक्त 1746 बड्या लोकांनी महापालिकेचे 5182 कोटीं थकवले 

विकासकामांना निधी देऊनही उदघाटनाला बोलावले जात नाही

: आमदार, खासदार महापालिका प्रशासनावर नाराज

: जिल्हा नियोजन कार्यालयाकडे नाराजी व्यक्त

पुणे:  सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अशा विविध योजना पुणे महानगरपालिके मार्फत राबविण्यात येतात. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून याला निधी प्रस्तावित केला जातो. हे काम जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार व नियोजन समिती सदस्य करत असतात. मात्र प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून या लोकप्रतिनिधींना उदघाटन समारंभास बोलावले जात नाही. याबद्दल लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

: माहिती फलक दर्शनीभागावर लावणे अपेक्षित

पुणे जिल्हयातील सन्माननीय पालकमंत्री, खासदार, आमदार, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य हे आपल्या मतदारसंघात संवसामान्य जनतेच्या उपयोगी पडेल अशी विविध विकास कामे प्रस्तावित करतात. ही विकास कामे पुर्ण झाल्यावर ते काम कोणत्या योजनेतून घेण्यात आले आहे. तसेच प्रस्तुत काम कोणी प्रस्तावित केले त्यांचे नाव, प्रशासकीय मान्यता रक्कम, एकुण खर्च रक्कम, काम सुरू दिनांक, काम पुर्ण दिनांक, ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी, कार्यान्वयीन यंत्रणेचे नाव याबाबतपशील दर्शविणार पक्क्या स्वरूपाचा माहिती फलक दर्शनीभागावर लावणे अपेक्षित आहे. मात्र हे काम गंभीरपणे केले जात नाही. शिवाय संबंधित योजनेच्या अंतर्गत घेण्यात आलेली विकास कामे पुर्ण झाल्यावर, ज्या सन्माननीय लोकप्रतिनिधी सदरचे विकास काम प्रस्तावित केले आहे त्यांना उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले जात नसलेबाबत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे नाराजी व्यक्त केली जात आहे.

: महापालिका प्रशासनाने घेतली दखल

या तक्रारीची महापालिका प्रशासन व नियोजन समिती सेल ने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाने त्याबाबत एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार इथून पुढे ज्या सन्माननीय लोक प्रतिनिधींनी उपरोक्त योजनेतून कामे प्रस्तावीत केली आहेत त्यांना उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित करणे आवश्यक आहे. शिवाय काम पुर्ण झाल्यानंतर योजनेची अनुषंगीने माहिती दर्शविणारा पक्क्या स्वरूपाचा फलक प्रत्यक्ष जागेवर लावण्याची दक्षता घेण्यात यावी. असे ही आदेशात म्हटले आहे.