महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट   : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप   : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

HomeपुणेPolitical

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

Ganesh Kumar Mule Sep 05, 2021 6:50 AM

Pimpari Congress | पिंपरी शहरात काँग्रेसला मतदार संघ मिळण्याचे राज्य नेतृत्वाकडून संकेत
Dr Neelam Gorhe | राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
Stall on ST Bus Stand | आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट

: राज ठाकरेंचा सरकारवर आरोप

: महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

पुणे: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.

: सरकारलाच निवडणूक नको

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव सणांसाठी निर्बंध लागू केल्यासंदर्भात पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकाराचं, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर गंभीर आरोप केले आहेत. नुसतं त्या कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे. “राज्य सरकारलाच निवडणुका नको आहेत. निवडणूकघेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

: ओबीसी जनगणना करा आणि निवडणुका घ्या

ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, असंही ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0