महापालिका नाव समिती निवडणूक
अध्यक्ष पदी घोगरे तर उपाध्यक्ष पदी एकबोटे
पुणे. पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीच्या अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे यांची निवड झाली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने अध्यक्षपदासाठी घोगरे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी एकबोटे यांना संधी देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश ढोरे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे विशाल धनवडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
भाजपच्या उमेदवारांना आठ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तीन मते पडली. महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह समितीचे अन्य सभासद उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काम पाहिले.
COMMENTS