नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षीही फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था  : महापालिकेबरोबरच स्व खर्चाने बनवले फिरते विसर्जन हौद  : नागरिकांना होतोय लाभ

Homeपुणेमहाराष्ट्र

नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षीही फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था : महापालिकेबरोबरच स्व खर्चाने बनवले फिरते विसर्जन हौद : नागरिकांना होतोय लाभ

Ganesh Kumar Mule Sep 12, 2021 8:34 AM

Sindoor Yatra BJP | पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘सिंदूर यात्रा’
Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!
Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षीही फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था

: महापालिकेबरोबरच स्व खर्चाने बनवले फिरते विसर्जन हौद

: नागरिकांना होतोय लाभ

पुणे:  लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रदीर्घ आणि समृद्ध अशी परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया पुण्याने महाराष्ट्राला घालून दिला. सर्वांगसुदंर गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करुन मांगल्यपुर्ण वातावरणात बाप्पाची पुजा आणि प्रबोधन करणारे देखावे या उत्सवाची शान वाढवतात. मोठ्या उत्सहात गणेश उत्सव साजरा होत असताना संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाहि गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी हि जल्लोष आणि दिमाखदारपणा नसला तरी भक्तीमय आणि मांगल्य पुर्ण वातावरणात शुक्रवारी श्रीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने लाडक्या बाप्पाच्या आगमणाचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये पाहवयास मिळत होता. कोरोनाच्या काळात आलेले मळभ दूर करीत बाप्पाच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते.

: नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीहि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असतानाच नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. अशा नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एका फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात येणार असून नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षी सुद्धा विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असतानाच नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे. असे आवाहन नगरसेवक वाबळे यांनी केले आहे. मात्र ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षी सुद्धा क्रांती सुर्य महात्मा फुले (तीन हत्ती ) चौक, पद्मावती, नवजीवन सोसायटी येथील संत रोहिदास उद्यान तसेच शिंदे हायस्कूल चौक याठिकाणी विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णाजी इंदलकर यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक वाबळे यांनी केले आहे. यावेळी प्रशांत दिवेकर , बिपिन पोतनीस, कैलास मोरे ,सारिका ताई ठाकर , सुधीर रानडे,अमित सहानी , शांताराम सोनवणे इत्यादी उपस्थित होते.