डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार   : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार

Homeपुणेमहाराष्ट्र

डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार

Ganesh Kumar Mule Aug 30, 2021 12:14 PM

Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रजच्या विविध प्रश्नासाठी 31 ऑगस्ट ला जनआंदोलन
Pune BJP | PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही | धीरज घाटे
Bharat Surana : Congress : कॉग्रेस नेहमीच व्यापाऱ्यांसाठी सहकार्याच्या भूमिकेत – बागवे
डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार
: जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार
पुणे. जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा ‘महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार २०२१’ डॉ धनश्री वायाळ यांना प्रदान करण्यात आला.
पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी युथ मानव अधिकार इंटरनॅशनलच्या संचालक थेरेसा मायकीएल, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सुजाता शानमे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित सभासदांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अगोदर तज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र आयोजित केले होते. यात कॅन्सर तज्ञ डॉ. रेश्मा पुराणिक, संधिवात तज्ञ डॉ. प्रवीण पाटील, सांधे प्रत्यारोपण तज्ञ डॉ प्रशांत टोणपे , प्लास्टिक सर्जन डॉ. स्वप्ना आठवले यांची व्याख्याने झाली.
या कार्यक्रमास जीपीए अध्यक्ष डॉ शिवाजी कोल्हे, उपाध्यक्ष डॉ. हरीभाऊ सोनवणे, खजिनदार डॉ. श्रीराम जोशी, जॉईंट सेक्रेटरी डॉ. संदीप निकम, डॉ. आप्पासाहेब काकडे, प्रियदर्शनी चेअरमन डॉ वैशाली लोढा, प्रियदर्शिनी व्हाईस चेअरमन डॉ प्रिया सोनवणे , डॉ प्रेरणा बर्वे, प्रियदर्शनी जॉईंट सेक्रेटरी डॉ स्मिता डोंगरे, डॉ सयानी गांधी उपस्थित होते. जीपीए सेक्रेटरी डॉ. शुभदा जोशी प्रियदर्शनी सेक्रेटरी डॉ. मनीषा खेडकर व डॉ रश्मी खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर जीपीए सेक्रेटरी डॉ. सुनील भुजबळ यांनी आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0