टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेणाऱ्या अवनी लेखरासह  विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Homeमहाराष्ट्रदेश/विदेश

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेणाऱ्या अवनी लेखरासह विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Ganesh Kumar Mule Aug 30, 2021 6:12 AM

The Laws of Human Nature Hindi Summary |  Robert Greene | लोगों के साथ व्यवहार करने के लिए मानव स्वभाव के नियमों को जानना चाहिए  | इसके लिए रॉबर्ट ग्रीन की पुस्तक द लॉज़ ऑफ ह्यूमन नेचर पढ़ें
Chemist Association | केमिस्ट असोसिएशन प्रतिनिधी मंडळाचा ब्रिसबेन येथील जागतिक परिषदेत सहभाग
Amit Shah : Pune : अमित शाह यांचा कॉंग्रेस वर निशाणा ; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘सुवर्णवेध’ घेणाऱ्या अवनी लेखरासह  विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
 प्रत्येक भारतीयाला तुमच्या कामगिरीचा अभिमान
  -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :  टोकियो येथे सुरु असणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरुन अवनी लेखरा भारतासाठी पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक तर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकले. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी भारतासाठी पदकांच्या विजयाची हंडी फोडणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्यासह अवनी लेखराने नवे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा प्रस्थापित केले. थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकत पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदकांची लयलूट केली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंनी पदके जिंकत देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केलं आहे, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0