सदाशिव पेठेत आग!   :  अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश   : कोणी जखमी नाही

Homeपुणे

सदाशिव पेठेत आग! : अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश : कोणी जखमी नाही

Ganesh Kumar Mule Sep 11, 2021 5:13 AM

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून फायरमन पदाचा निकाल घोषित
Sharad pawar : Pune Metro : शरद पवार यांचा पुणे मेट्रोने प्रवास!  : चंद्रकांत पाटील यांनी साधले शरसंधान 
MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

सदाशिव पेठेत आग!

:  अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश

: कोणी जखमी नाही

पुणे: आज पहाटे सहा वाजता सदाशिव पेठ, देशमुख वाडी, गुरुचरण अपार्टमेंट येथे टेरेसलगत असणारया ऑफिसमधे आग लागली होती. आगीमधे ऑफिसमधील सर्व साहित्य जळाले असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज असून जखमी कोणी नाही. अशी माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली.

: आगीत आर्थिक नुकसान

विभागाच्या माहितीनुसर सदाशिव पेठेत दोन मजली इमारतीच्या टेरेसवरील काही भागात कार्यरत असणाऱ्या एका कार्यालयात शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती. ती दलाच्या जवानांनी वीज पुरवठा बंद असल्याची खात्री करून दोन डिलेवरी हाजची लाईन करुन तसेच हाज च्या सहाय्याने आगीवर पाण्याचा सतत मारा करून आग विझविली. या आगीमध्ये ऑफिसमधिल इलेक्ट्रिक वायरिंग, कॉम्प्युटर, लाकडी साहित्य, असे सर्व साहित्य जळाल्याने आर्थिक
नकसान झाले आहे. या ठिकाणी आग प्रतिबंधक योजना
उपलब्ध नव्हती. यासाठी पोलिसांची ही मदत मिळाली. शिवाय दलाचे जवान प्रकाश गोरे, तांडेल पायगुडे, ड्राइवर सचिन चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात प्रयत्न केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0