नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात 115MLD पाण्यावर प्रक्रिया
: महापालिकेचा दुसरा मोठा प्रकल्प
: नवीन यंत्रणेमुळे खर्चात बचत
पुणे: ११५ एम. एल. डी नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्र हा पुणे मनपाचा दूसरा सर्वात मोठा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. या केंद्रामधून पुणे मनपाच्या मध्यवर्ती भागातून येणाऱ्या मैलापाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. प्रकल्प बनवताना आधुनिक यंत्रणेचा वापर केल्याने महापालिकेच्या खर्चात बचत झाली आहे. अशी माहिती विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
: महापालिकेची 10 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र
पुणे महानरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पुणे मनपाची एकूण ५६७ एम.एल.डी. क्षमतेची एकूण १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. सदर १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामधून दैनंदिन सरासरी ५०० ते ५३० एम.एल.डी एवड्या मैलापाण्यावर मे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे प्रक्रिया करून नदीमध्ये सोडले जाते. सध्या सर्व मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या इनलेट व आऊटलेट पाण्याची तपासणी एन.ए.बी.एल. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत केली जाते. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पुणे महानरपालिकेच्या सर्व मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे येथे आऊटलेट पाण्याची तपासणीसाठी आनलाईन मॉनिटरीग यंत्रणा पुरविणे व बसविणे बंधनकारक आहे असे पुणे मनपास कळविले आहे. पुणे महानरपालिकेच्या एकूण १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी जुना नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्र हे ३० वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याने त्याची पुनर्बाधणी जायका प्रकल्पामध्ये होणार असल्याने एकूण ९ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांवर आनलाईन मॉनिटरीग यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन मॉनिटरीग यंत्रणेमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचे पी.एच, बी.ओ.डी, सी.ओ.डी, टी.एस.एस व पाण्याचा फ्लो (प्रवाह) इ. गुणधर्म यांची मोजणी केली जाणार आहे. यंत्रणा ऑनलाइन (२४*७) असून यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही. सदर यंत्रणा भाडेतत्वावर
बसविण्यासाठी मे. एरॉन सिस्टिम प्रा.लि. यांना मा. स्थायी समिति द्वारा कार्यादेश देण्यात आलेला आहे. सध्या सदर
यंत्रणा पुणे महानरपालिकेच्या बाणेर व नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्र येथे कार्यान्वित झालेली आहे व इतर
ठिकाणी यंत्रणा बसविण्याचे काम चालू आहे. हे सर्व गुणधर्म. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पुणे मनपाचे पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या प्रक्रिया केलेल्या पाण्याचे गुणधर्माची तपासणी प्रत्यक्ष प्रयोगशाळेमद्धे करण्यात येत होती. सदरच्या खर्चाची बचत या यंत्रणेमुळे होणार आहे. ११५ एम. एल. डी नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्र हा पुणे मनपाचा दूसरा सर्वात मोठा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे.या केंद्रामधून पुणे मनपाच्या मध्यवर्ती भागातून येणाऱ्या मैलापाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. सध्या सदर केंद्र चालविणे व देखभाल दुरुस्ती करणेचे काम मे, विश्वराज एनव्हरोमेंट प्रा. लि. यांचेमर्फत केले जात आहे. सध्या सदर केंद्रामधून ११० ते ११५ एम.एल.डी.एवढ्या मैलापाण्यावर प्रक्रिया केली जात
आहे. या कामासाठी वरिष्ठ केमिस्ट अस्लम शेख आणि कार्यकारी अभियंता प्रमोद उंडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

COMMENTS