चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार सुनील कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पुणे. पुणे कँटोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले .यावेळी भारतीय जनता पार्टी व सूनीलभाऊ कांबळे मित्र परिवाराच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रम ही घेण्यात आला होता .या कार्यक्रमास सर्वच पक्ष ,संघटनाचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांनी उपस्थिती लावून सुनील कांबळे यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट हा भाग पुण्याचा अतिशय महत्त्वाचा भाग असून येथील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्याचे काम सर्वांनी एकजुटीने करावे.कँटोन्मेंट भागातील काही प्रश्न केंद्र सरकारशी संभधित असल्यास आपण त्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले .
याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ,सभागृह नेते गणेश बिडकर ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,महेश पुंडे,यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
COMMENTS