स्फोटांनी काबूल हादरले!   इस्लामिक स्टेट ने स्वीकारली जबाबदारी

Homeदेश/विदेश

स्फोटांनी काबूल हादरले! इस्लामिक स्टेट ने स्वीकारली जबाबदारी

Ganesh Kumar Mule Aug 27, 2021 6:06 AM

IPL starting Match: ऋतुराज ने दमदार खेळी करत सावरले चेन्नईला
Meditations | Shri Shivkripanand Swami | योग द्वारेच ‘वसुधैव कुटुम्बकम” ची परिकल्पना साकार होणे संभव | परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी
Investment Tips Hindi Summary | सफल निवेश के लिए 10 आवश्यक युक्तियाँ

स्फोटांनी काबूल हादरले!

इस्लामिक स्टेट ने स्वीकारली जबाबदारी

काबूल: तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सुरुवातीपासून या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना असल्याची अशी भीती होती आणि आता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली आहे.

गुरुवारी काबूल विमानतळाजवळ झालेल्या सात बॉम्बस्फोटांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत ७२ जण ठार झाले आहेत. ठार झालेले उर्वरित ६० लोक अफगाण नागरिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल आहे. याशिवाय आणखी १४३ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी १८ हून अधिक अमेरिकन लष्करी कर्मचारी जखमी झाले आहेत आणि संख्या वाढू शकते अशी माहिती दिली आहे.

काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (IS) ने स्वीकारली आहे. या संघटनेने काबूल विमानतळाच्या गर्दीच्या गेटवर स्फोट घडवलेल्या आत्मघातकी हल्लेखोराचा फोटोही प्रसिद्ध केला आहे. इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन हा हल्ला करणारा तोच हल्लेखोर होता असे म्हटले आहे.

आयएसने हल्लेखोर तालिबानच्या सुरक्षा चौक ओलांडण्यात यशस्वी झाला आणि तो स्फोट करण्यापूर्वी अमेरिकन सैनिक, अफगाणी नागरिकांच्या ५ मीटर (यार्ड) परिसरात गेला. त्यानंतर त्याने स्फोट घडवून आणला.

इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्यात म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन सैनिक आणि अफगाण नागरिकांना लक्ष्य केले. या स्फोटावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी “हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असे म्हटले आहे.