शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना!   – स्थायी समिती समोर प्रस्ताव

HomeपुणेPMC

शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना! – स्थायी समिती समोर प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Aug 27, 2021 8:42 AM

PMC Aspirational Toilets | 4 आकांक्षी शौचालय तयार करण्याच्या बदल्यात 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला महापालिका ठेकेदाराला देणार परवानगी! 
Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Cleanliness campaign | धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम| २११ टन कचरा केला गोळा

शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना!

 – स्थायी समिती समोर प्रस्ताव
 पुणे.  महानगरपालिका आणि पीएमपी प्रशासनाकडून शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यदशम योजना 10 रुपयांत  सुरु करण्यात आली आहे.  याद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास करता येतो.  परंतु शहरातील खेळाडूंना बालेवाडीला जाण्यात अडचणी येतात.  यामुळे पुण्यदशम  योजनेअंतर्गत बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. नुकतीच क्रीडा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली होती. आता हा प्रस्ताव स्थायी समिती समोर आला आहे.
 – मध्यवर्ती भागात पुण्यदशम  योजना
 महापालिका  प्रशासन आणि पीएमपी प्रशासनाने शहरात पुण्यदशम योजना सुरू केली आहे.  पहिल्या टप्प्यात, 9 जुलैपासून पुणे आणि पेठच्या मध्यवर्ती भागात 50 आकर्षक गुलाबी रंगाच्या मध्यम बसेस प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत.  यानंतर, डिसेंबरमध्ये 300 बसेस देऊन ही योजना शहराच्या सहा विभागात विस्तारित केली जाईल.  या योजनेसाठी तिकीट किंमत 10 रुपये आहे.  एका दिवसात कितीही वेळा प्रवास करण्यासाठी एकच तिकीट वापरले जाऊ शकते.  संपूर्ण प्रवास वातानुकूलित आहे.  आसन क्षमता 24 आहे.  MIDI आकार अरुंद रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल.  ही बस नैसर्गिक इंधन सीएनजीवर धावेल.  मुख्य रस्त्यांवर दर पाच मिनिटांनी आणि अंतर्गत रस्त्यांवर दर पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध असतील.  त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  त्याच धर्तीवर खेळाडूंसाठी बस सुरू करण्याची मागणी होती.
–  एका दिवसात बालेवाडीच्या एकूण 8 फेऱ्या होतील
 यासंदर्भात  नुकतीच पालक संघटनेसोबत बैठक घेतली गेली होती.  यामध्ये पालकांनी बालेवाडीला जाण्यासाठी खेळाडूंना अडचणी येत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बालेवाडीसाठी खेळाडूंसाठी ही योजना सुरू करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव क्रीडा समितीसमोर आणण्यात आला होता.  स्वारगेट ते बालेवाडी, कात्रज ते बालेवाडी, पुणे स्टेशन ते बालेवाडी आणि शिवाजी नगर ते बालेवाडी अशा दिवसात या बसच्या 8 फेऱ्या केल्या जातील.  स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.