महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी  – नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव

HomeपुणेPMC

महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी – नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Aug 27, 2021 9:12 AM

Rupali Chakankar : अंतर्गत तक्रार निवारण समिती कार्यरत नसल्यास कारवाईला सामोरे जा : रुपाली चाकणकर यांचा इशारा
Pune Water Cut | If water supply is shut off for maintenance repairs, disclose the details
PMC: Garbage project: GB meeting: आता हडपसरला कचरा प्रकल्प नको!
  • महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी

– नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव
पुणे. भारतात कर्करोगामुळे सरासरी दर 8 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. ह्युमन पापिलोमा वायरस (HPV) नावाच्या विषाणू मुळे होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. शहरातील महिलांमधील कर्करोगाचे हे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी. अशी मागणी भाजप नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी केली आहे. तसा एक प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
– स्थायी समिती समोर प्रस्ताव
नागपुरे यांच्या प्रस्तावानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आता हा आजार टाळता येऊ शकतो. पुणे महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या महिलांच्या आरोग्याची जबाबदारी आपण घेऊन ह्या कर्करोगापासून त्यांचा बचाव करण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी काही  उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेने आरोग्य विभागव्या सन २०२१-२०२२ च्या बजेट मधून HPV लस खरेदी करणे आणि म.न.पा.व्या व खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलींना हि लस देण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविणे. तसेच २०२२-२०२३ च्या अंदाजपत्रकात HPV लस विकत घेण्यासाठी आणि सदर मोहीम राबविण्यासाठी तरतूद उपलब्ध करून द्यावी. शिवाय पुणे महानगरपालिकेने कर्करोग या विषयात काम करणाऱ्या आरोग्य संस्थांच्या मदतीने प्रौढ महिलांच्या कर्करोग संदर्भातल्या चाचण्या करणे. या दोन्ही उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास या प्रकारच्या कर्करोगावे समूळ उच्चाटन येऊ शकते. असे नागपुरे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0