नारायण राणेंनी घेतला उपमुख्यमंत्र्यांचा समाचार:   राणे म्हणाले अजित पवार अज्ञानी

Homeमहाराष्ट्र

नारायण राणेंनी घेतला उपमुख्यमंत्र्यांचा समाचार: राणे म्हणाले अजित पवार अज्ञानी

Ganesh Kumar Mule Aug 29, 2021 7:23 AM

Pune Cantonment Board | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला त्यांच्या हिस्स्याचे जीएसटी चे पैसे मिळावेत |आमदार सुनील कांबळे यांची विधान सभेत मागणी
Recruitment: Maharastra: नववर्षात महाराष्ट्रात मेगाभरती! : एवढी पदे भरणार!
Old Pension Scheme | निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार | त्यानंतरच्या कालावधीत रूजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

नारायण राणेंनी घेतला उपमुख्यमंत्र्यांचा समाचार

: राणे म्हणाले अजित पवार अज्ञानी

सिंधुदुर्ग: जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कणकवली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:च्या खात्याचं पाहावं असा प्रहार केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली येथे प्रश्न विचारला असता अजित पवार अज्ञानी आहेत, असा पलटवार त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केला.

– राष्ट्रवादी कडे अजून आलो नाही

“अद्याप राष्ट्रवादीकडे वळलो नाही. तुमच्या तिजोरीत खडकडाट असल्याने केंद्राकडे हात पसरले, राज्यातील शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना , एसटीचे पगार देण्यासाठी पैसा नाही. ही राज्याची अवस्था आहे. एका रात्रीत आपल्यावरी गुन्हे काढून टाकण्यासाठी पदाची शपत घेणाऱ्या अजित पवारांनी मला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला नारायण राणे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार काय म्हणाले होते?

राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच निधी दिला आहे. राज्यात अनेक कामेही प्रगतीपथावर आहेत, असे अजित पवार म्हणाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0