Ravindra Dhangekar: kasaba peth: नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या पुढाकाराने कसबा पेठेत पाणीपुरवठा सुरळीत

Homeपुणेsocial

Ravindra Dhangekar: kasaba peth: नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या पुढाकाराने कसबा पेठेत पाणीपुरवठा सुरळीत

Ganesh Kumar Mule Feb 14, 2022 7:12 AM

Kasba Peth by-election | कसबा पेठ पोटनिवडणुक | कॉंग्रेसच्या १६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती
Ravindra Dhangekar | रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील
Vasant More | Pune Loksabha | अपेक्षेप्रमाणे पुणे लोकसभा निवडणूक होणार तिहेरी! | वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी

नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या पुढाकाराने कसबा पेठेत पाणीपुरवठा सुरळीत

पुणे: गेल्या काही दिवसापासून कसबा पेठ परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून आणि पाणीपुरवठा विभागाच्या टीमला सोबत घेत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सोय झाली आहे.
धंगेकर म्हणाले, कसबा पेठेत पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून मुख्य पाणी पुरवठा अधिकारी पावसकर साहेब आणि त्यांची पुर्ण टिमला बरोबर घेऊन सकाळी सात वाजता शनिपार चौकातील मुख्य जलवाहिनी चेक करण्यात आली.

कसबापेठ येथील पाणीपुरवठा संदर्भात नुकतीच मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर, सकाळी सात वाजता प्रत्यक्ष सर्व अधिकाऱ्यांची टीम या शनिपार या ठिकाणी जलवाहिनी चेक करण्यासाठी आली होती. यावेळी सर्व तांत्रिक बाबी समजावून सांगत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत. असे ही धंगेकर म्हणाले.