Agitation of NCP Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन : दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

HomeपुणेPolitical

Agitation of NCP Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन : दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

Ganesh Kumar Mule Mar 28, 2022 1:45 PM

NCP Pune | पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन 
Agitation : PMC Employees : अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना मोडीत काढण्या विरोधात महापालिका कर्मचारी करणार निदर्शने  : 12 मे ला महापालिका भवनासमोर आंदोलन 
Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध

पुणे : केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत आपला निषेध नोंदवला.

“दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते. गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. सर्वसामान्य नागरिकांवर ही भाववाढ लादत असताना केवळ देशातल्या काही बड्या उद्योगपतींना याचा फायदा होत असून, भारतीय जनता पार्टीला आपले हितसंबंधी उद्योगपती यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच केवळ सर्वसामान्य जनतेवर ती महागाई लादयची आणि उद्योगपतींची संपत्ती वाढवणे हाच भाजपचा गेल्या ७ वर्षातील अजेंडा राहिला आहे. परंतु जर देशातील जनतेची ही लूट थांबली नाही तर भविष्यात तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय मारले जाणार असून हा देश पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात येईल त्यामुळेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील जी जनतेची लूट चालवली आहे, ही लूट थांबवावी, यासाठी आजचे आंदोलन असून सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा शिकावा व पुन्हा भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवु नये” , असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

या आंदोलन प्रसंगी  पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष  संतोष नागरे, महिला शहराध्यक्ष .मृणालिनीताई वाणी ,प्रवक्ते  प्रदीप देशमुख, विपुल म्हैसुरकर,श्वेता कामठे होनराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.