सुसंस्कृत पक्षातील आमदार अशी भाषा कशी वापरू शकतो?
: राष्ट्रवादी काँग्रेस चा सवाल
पुणे: पुण्यातील भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची एक विडिओ क्लिप वायरल होत आहे. मात्र ही क्लिप आपली नाही असा खुलासा आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ने आमदाराच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
: मान शरमेने खाली गेली : काकडे
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे म्हणाले, आज पर्यंत मी अनेक लोकप्रतिनिधींच्या वादग्रस्त व्हिडीओ क्लिप्स ऐकल्या आहेत. पण आज पुण्यातील आमदाराची क्लिप ऐकत असताना माझी मान शरमेने खाली गेली. इतकी खालची भाषा सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या पक्षातील आमदार कसा करू शकतो ?
:सभ्यतेच्या सर्व मर्यादा तोडल्या : जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस से पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेतील एका कर्तव्यनिष्ठ अशा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण संभाषणाची ध्वनिफीत विविध समाज माध्यमांनी व्हायरल होत आहे. भारतीय जनता पक्षाचा इतिहास बघितल्यास महिलांच्या अवमानाच्या अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र आमदार सुनील कांबळे यांनी आज सभ्यतेच्या सर्व मर्यादा तोडत अतिशय खालच्या भाषेत महिला अधिकाऱ्यांशी वर्तन केले आहे.
COMMENTS