पुणेकरांनी टीका केली; पण मेट्रो काम सुरु झाल्याचा आनंद
: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : आधीपासून पुण्याशी माझा जवळचा संबंध आहे. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विशेषतः पुण्याकडे, नागपूरकडे माझं लक्ष आहे. मी दोन्ही जिल्ह्यांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही. नागपूरच्या मेट्रोचं काम पुढं गेलं. त्यावेळी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका झाली. पुण्यात मेट्रो भुयारी करायची, की वरून सुरू करायची यावर वाद होते. आग्रहाने निर्णय घेतला आणि मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली. याचा मला आनंद आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
: सिंहगड रोड उड्डाणपुलाचे भूमिपूजन
आज पुण्यात सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते….गडकरी म्हणाले, चंद्रकांत दादांना ४० मिनिटांत पुण्याहून कोल्हापूरला जाता येईल १ कोटी रुपये मेट्रोची किंमत आहे. पुणे-कोल्हापूर, सोलापूर, बारामती, लोणावळा येथे ब्रॉड गेज मेट्रो चालणार आहे. दोन बिझनेस क्लास विमानासारखे आहेत. विमानात हवाई सुंदरी असतात, तसेच येथेही असेल. त्याचं तिकीट एसटीच्या तिकीटीसारखं आहे. याचा वेग देखील १४० किलोमीटर आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांना ४० मिनिटांत कोल्हापूरला जाता येईल, असेही गडकरी म्हणाले.
COMMENTS