Pune News | श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित विश्वातील पहिली पुणे जिल्हास्तरीय शंखवादन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न!
(The Karbhari News Service) – 27 जुलै रोजी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानतर्फे विश्वातील पहिली पुणे जिल्हा स्तरीय शंखवादन स्पर्धा आणि शंखपथक मेळावा यांचे भव्य आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा म.ए.सो. मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय (भावे स्कूल), पुणे येथे पार पडली.
ही स्पर्धा पुणे विभागासाठी घेण्यात आली होती. यात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमधून विविध वयोगटांतील शंखवादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी ५ वयोगट बनविण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ५ उत्तेजनार्थ पारितोषिके देखील प्रदान करण्यात आले
स्पर्धेचे उद्दिष्ट:
या ऐतिहासिक स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे शंखवादन या पौराणिक परंपरेचा प्रचार व प्रसार करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, शंखवादना सारख्या प्राचीन विद्येला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आणि या परंपरेला आधुनिकतेशी जोडून नव्या जोमाने पुढे नेणे हा उद्देश होता.
श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या ह्या कार्या पासून प्रेरीत होऊन राज्यातील शंख पाथकांची दमदार वाटचाल सुरु.
परीक्षक म्हणून नेमणूक:
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पंचजन्य शंखनाद पथक, विष्णुनाद शंखपथकाचे संस्थापक व अध्यक्ष आणि प्रतिष्ठानचे शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. संजय मुरदाळे (धार्मिक विभाग प्रमुख, विश्व हिंदू परिषद – महाराष्ट्र व गोवा), बाळासाहेब दाभेकर (अध्यक्ष – भारत मित्र मंडळ), श्री. अमित सुरेश पवार (मा. उपसरपंच, शेवाळेवाडी व संस्थापक अध्यक्ष – राजे क्लब), ॲड. प्रशांत शंकरराव यादव (संघचालक – कसबा भाग) हे उपस्थित होते.
मा. श्री बाळासाहेब दाभेकर व प्रो. संजय मुरदाळे या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घन:शाम गडे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत सर्व शंखवादकांचे विशेष अभिनंदन केले.
ही स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पार पडली. त्यानंतर शंखनाद पथकांचे एकत्रित सादरीकरण व प्रतिष्ठानतर्फे भव्य सादरीकरण करण्यात आले.
श्रीमंत केसरी प्रतिष्ठान ही संस्था पौराणिक वाद्यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे. या शंखपथक मेळाव्यात पंचजन्य शंखनाद पथक, विष्णुनाद शंखपथक व समर्थ योग शंखवादक यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन हे सौ अलका जोशी व कु. वैष्णवी सोमनाथ वाले यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या सर्व शाखेतील सर्व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले…

श्रीमंत केशरी प्रतिष्ठान आयोजित विश्वातील पहिली पुणे जिल्हास्तरीय शखंनाद स्पर्धा२०२५ विजेते
गट क्रमांक १वय वर्ष १ते८
प्रथम क्रमांक -कु आरुष करण लोहकारे
द्वितीय क्रमांक -कु प्रणव काळे
गट क्रमांक २वय वर्ष८ते१५
प्रथम क्रमांक -आराध्या उमेश गडे
द्वितीय क्रमांक-रुद्र फलांडे
तृतीय क्रमांक- भार्गव गणेश शहाणे
उत्तेजनार्थ-कौस्तुभ मावडीक
उत्तेजनार्थ-रेवती केसरकर
उत्तेजनार्थ-सार्थ शितांशू कुलकर्णी
उत्तेजनार्थ-प्रसन्ना श्रीकांत गांधी
गट क्रमांक ३वय वर्ष15 ते 30
प्रथम क्रमांक -अनीश बलवंत दंडवते
द्वितीय क्रमांक-गायत्री राजेश लोहिया
तृतीय क्रमांक- आदित्य गलगली
उत्तेजनार्थ-वेदांत रामचंद्र माने
उत्तेजनार्थ-आयुष शाम ढोले
उत्तेजनार्थ-आनंद दीपक पाटील
गट क्रमांक ४ वय वर्ष ३० ते ५०
प्रथम क्रमांक -माधुरी पांडुरंग सोनावणे
द्वितीय क्रमांक- सोनाली सचिन सराफ
तृतीय क्रमांक-संतोष तात्याबा सारजिने
उत्तेजनार्थ-पुष्करराज राजु गोयल
उत्तेजनार्थ-प्रसाद बापट
उत्तेजनार्थ- अमृता भूषण अंधारे
उत्तेजनार्थ- योगिता अतुल जकताप
उत्तेजनार्थ- विलास गुलाबराव मातडे
गट क्रमांक- ५ वय वर्ष ५0 तेअधिक
प्रथम क्रमांक – उमेश दत्तात्रय ढोलरे
द्वितीय क्रमांक- सोमनाथ शशिकांत वाले
तृतीय क्रमांक-अशोक राजाराम वेल्हाळ
उत्तेजनार्थ-सविता सतिश देवधर
उत्तेजनार्थ- धन्नालाल भोरटक्के
उत्तेजनार्थ- सुधाकर कुलकर्णी
उत्तेजनार्थ- संजीव चंद्रशेखर पडवळ
उत्तेजनार्थ-गणेश किसनराव येनपुरे




COMMENTS