कल्याणीनगर मधील जागा पार्किंग आणि एन्ट्री-एक्झिट साठी मेट्रो ला उपलब्ध करून दिली जाणार
: शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव
पुणे. महाराष्ट्र मेट्रो रेल यांनी येरवडा टीपी स्किम फायनल प्लॉट क्रमांक ७०/१८ पैकी येथील सुमारे ३२६२.७५ चौमी जागेपैकी ३९७.९७ चौ.मी. जागा कल्याणीनगर स्टेशनच्या एन्ट्री- एक्झिट बांधकाम करणेसाठी दीर्घ मुदतीकरिता हस्तांतरीत करणेची मागणी पुणे महापालिकेकडे केलेली आहे. त्यानुसार ही जागा मेट्रो ला दिली जाईल. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे.
: 2 कोटी पेक्षा जास्त जागेची किंमत
मागणी केलेली जागा ही टीपी स्किम नुसार पुणे मनपाच्या
ताब्यात आलेली असून त्याठिकाणी विकास आराखड्यानुसार पी.एस.पी. झोन दर्शविलेला आहे. मागणी केलेली जागेच्या ठिकाणी यापूर्वी पुणे मनपाच्या तृतीय व चतुर्थ सेवकांच्या गृहबांधणी संस्थांना निवासी इमारती बांधण्यासाठी सुमारे ७८४५ चौमी जागा उपलब्ध करून देणेस मुख्य सभेची मान्यता प्राप्त झालेली असून पुढील प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरु आहे. परंतु सदर जागा मेट्रो स्टेशनच्या एन्ट्री-एक्झिट साठी आवश्यक असून त्यासाठी ३९७.९७ चौमी क्षेत्र महामेट्रोस दीर्घ मुदतीकरिता हस्तांतरित करणे गरजेचे आहे. कल्याणीनगर मेट्रो स्टेशनचे एन्ट्री- एक्झिट साठी आवश्यक सुमारे ३९७.९७ चौमी जागेची सन २०२१-२१ च्या रेडी-रेकनर नुसार किंमत २,०३,००,४५०/- इतकी निश्चित करणेत आलेली आहे. त्यानुसार ही जागा मेट्रो ला दिली जाईल. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल.
COMMENTS