Pune Ganeshotsav | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा बेलूरच्या चेन्नाकेशव मंदिराचा देखावा | गणेश भक्तांचे ठरतोय आकर्षण!

Homecultural

Pune Ganeshotsav | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा बेलूरच्या चेन्नाकेशव मंदिराचा देखावा | गणेश भक्तांचे ठरतोय आकर्षण!

Ganesh Kumar Mule Sep 10, 2024 8:15 PM

PMC 75th Anniversary | पुणे महापालिकेच्या ४३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी!
Stall on ST Bus Stand | आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल
Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

Pune Ganeshotsav | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा बेलूरच्या चेन्नाकेशव मंदिराचा देखावा | गणेश भक्तांचे ठरतोय आकर्षण!

 

Ganapati Decorations – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या शुक्रवार पेठ परिसरातील श्री शिवाजी चौक मित्र मंडळाने यंदा बेलूरच्या चेन्नाकेशव मंदिराचा देखावा सादर केला आहे. हा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. (Pune Ganpati Decoration)

पुण्याचा गणेशोत्सव हा पुण्याचे वैभव मानला जातो. गणपती उत्सवासाठी आणि देखावे पाहण्यासाठी देशभरातून गणेश भक्त राज्याच्या या सांस्कृतिक नगरीत येत असतात. त्यामुळे शहरातील गणपती मंडळे देखील वेगवेगळ्या कल्पना लढवत देखावे सादर करत राहतात. शुक्रवार पेठ परिसरातील श्री शिवाजी चौक मित्र मंडळ देखील दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करत असते. (Pune News)

श्री शिवाजी चौक मित्र मंडळांची स्थापना 1968 साली कऱण्यात आली. मंडळाचे यंदाचे हे 56 वे वर्ष आहे. यंदा संदीप अडके हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळ विद्युत रोषणाई, पौराणिक, ऐतिहासिक देखावे सादर करीत असते. तसेच वर्षभर अनेक सामजिक उपक्रम देखील राबवत असते. जसे कि गरीब विद्यार्थ्यांना उपयोगी शालेय साहित्य वाटप, अनाथ, वृद्ध लोकांसाठी औषधे, गरजेच्या वस्तू, त्याचप्रमाणे दिवाळी फराळ यांचे वाटप, वारकरी बंधू साठी भोजन, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते. मंडळाच्या या उपक्रमाचे लोकांकडून दखल घेत कौतुक केले जाते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0