Pune Ganeshotsav : महापौरांनी पुणेकर आणि प्रशासनाला दिले मनःपूर्वक धन्यवाद : काय म्हणाले महापौर?

Homeपुणेcultural

Pune Ganeshotsav : महापौरांनी पुणेकर आणि प्रशासनाला दिले मनःपूर्वक धन्यवाद : काय म्हणाले महापौर?

Ganesh Kumar Mule Sep 20, 2021 3:00 AM

Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!
PMC Employees union : महापालिका कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या लघुपटाचे सचिन तेंडुलकर करणार प्रमोशन 
Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप

महापौरांनी  पुणेकरांचे  आभार न मानता दिले मनःपूर्वक धन्यवाद

: सामाजिक भान जपले

पुणे: करोना संकटाच्या सावटाखाली यंदा पुण्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडला आहे. रविवारी गणेश विसर्जनादिवशी पुणेकरांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत बाप्पाला निरोप दिला. यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका जाहीर निवेदनाद्वारे पुणेकरांचे मनापासून धन्यवाद दिले आहेत.

‘पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. मात्र, यंदाही करोनामुळे उत्सवामध्ये रंगत कमी आली. बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी होती. अशाही परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी कुरबूर न करता शिस्तबद्धपणे आणि वेळेत पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव पार पाडला. त्यामुळे सोहळ्यात सामाजिक भान जपले गेले. शिवाय परंपरा पाळली गेली. म्हणूनच मी आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो’, असे महापौरांनी  निवेदनात नमूद केले आहे.


: आभार न मानता मन:पूर्वक धन्यवाद देतो

‘दरवर्षी विसर्जन मिरवणुकांचा दणदणाट असतो. शिस्तबद्ध पारंपारिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईला डोलायला लावणाऱ्या डीजेंपर्यंत सर्वकाही मिरवणुकांमध्ये दिसून येते. त्याचबरोबर मिरवणुका अनुभवण्यासाठी देशभरातून लोक पुणे शहरात येतात. त्यामुळे शहरातील मिरवणूक मार्ग भाविक आणि हौशी पर्यटकांच्या तुडूंब गर्दीने फुलून गेलेला असतो. यंदा मात्र, करोना संकटामुळे गतवर्षी प्रमाणेच वातावरण होते. राज्य शासनासह महापालिका आणि पुणे पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. बाप्पांची विसर्जन मिरवणूक नसल्यामुळे सारे कसे साधेपणाने, शिस्तबद्धपणे आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच झाले. त्यामुळे पुढल्या वर्षी गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने, पण अशाच शिस्तीने, इकोफ्रेन्डली पद्धतीने साजरा होऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यामुळे या कुणाचे ही आभार न मानता मनपूर्वक धन्यवाद देतो. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, असे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे.