PM Narendra modi in PMC : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

HomeपुणेPMC

PM Narendra modi in PMC : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

Ganesh Kumar Mule Mar 06, 2022 8:00 AM

PM modi pune tour | मोदींचा पुणे दौरा वादात | मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा 
Caste Wise Census | नरेंद्र मोदी सरकारचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत
Pune Metro Launching | भाजपाला ऑनलाईन लोकार्पणावरच समाधान मानावे लागले | मोहन जोशी यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, खासदार छ्त्रपती उदयनराजे भोसले, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.