Ganesh Idol PMC Pune  | गणेशोत्सवात ५ लाख ५९ हजार ९५२ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित!  | ७ लाख ६ हजार ४७८ किलो जमा झाले निर्माल्य!

Homeadministrative

Ganesh Idol PMC Pune | गणेशोत्सवात ५ लाख ५९ हजार ९५२ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ७ लाख ६ हजार ४७८ किलो जमा झाले निर्माल्य!

Ganesh Kumar Mule Sep 18, 2024 7:45 PM

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे 
Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन
Ganesh Idol Immersion | गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये | महापालिकेचे नियोजन तयार! 

Ganesh Idol PMC Pune | गणेशोत्सवात ५ लाख ५९ हजार ९५२ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ७ लाख ६ हजार ४७८ किलो जमा झाले निर्माल्य!

| १ लाख ७६ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – यंदाच्या गणेश उत्सवात (Pune Ganeshotsav) पुणेकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत देखील आहेत. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात ७ लाख ६ हजार ४७८ किलो निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात १ लाख ७६ हजाराहून अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत. तर एकूण ५ लाख ५९ हजार ९५२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली ( Sandip Kadam PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation-PMC)

पुणे महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे, VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे देखील आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना केले होते.

पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय
करण्यात आली होती.

• १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४५ बांधलेले हौद मध्ये १०१२८१, एकूण २५५ ठिकाणी ५१६ लोखंडी टाक्या याठिकाणी एकूण २८२६०४ मूर्ती विसर्जन करण्यात आल्या.

• नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात आली होती. तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २३९ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे/ मूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यानुसार १७६०६७ मुर्त्या दान करण्यात आल्या.

क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी २९८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आल्याने एकूण ७०६४७८ किलो इतके निर्माल्य संकलन झाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0