PMC Medical College : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा!   : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता   : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

HomePMCदेश/विदेश

PMC Medical College : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Ganesh Kumar Mule Sep 16, 2021 4:17 PM

Departmental Examination | PMC Pune | लेखनिकी संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावे
Pune Helmet Day | PMC Pune | पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई | उद्याही  कारवाई मात्र ती तीव्र असणार! 
PMC Health Officer | डॉ निना बोराडे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नियुक्ती | २ वर्षासाठी असणार नियुक्ती

महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा!

: राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या एनएमसी (NMC) अर्थात राष्ट्रीय आरोग्य परिषदेने या कॉलेजला आज (गुरुवार) मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारुन रुग्णालय सुरु करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

: महापौर करत होते पाठपुरावा

महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (PMC Medical College) सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळावी यासाठी महापौर आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. अखेर याला यश आले असून लवकरच महाविद्यालय सुरु होणार आहे. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला आज नॅशनल मेडिकल कमिशनने (National Medical Commission) आज परवानगी दिली. यामुळे यावर्षी डिसेंबर पासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वैद्यकीय माहाविद्यालयाच्या डीनची नियुक्ती (dean post) करण्यात आली असून टीचिंग स्टाफच्या मुलाखती (Teaching staff interview) झाल्या आहेत. अन्य स्टाफची लवकरच भरती होईल. सध्या सणस शाळेत वर्ग व कमला नेहरू रुग्णालयात (Kamala Nehru Hospital) प्रात्यक्षिकाची सोय करण्यात आली आहे. लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारून रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे महापालिकेचे हे पहिलेच मेडिकल कॉलेज व रुग्णालय आहे. हे कॉलेज अहमदाबादच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालच्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून महापालिकेचे पदाधिकारी व गटनेते या ट्रस्टमध्ये असणार आहे.
कॉलेज चालवण्याचा सगळा खर्च कमीत कमी होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. हे कॉलेज चालवण्यासाठी साधरण दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाचा संकल्पापासून तर सिद्धीपर्यंतचा प्रवास या अंतिम मंजुरीने पूर्ण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. महापालिका स्तरावर आणि विशेषतः अंतिम मंजुरी मिळेपर्यंत मोठ्या तांत्रिक प्रक्रिया या मार्गात होत्या. या सर्व टप्प्यात स्वतः लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करुन घेतली. या प्रक्रियेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि आताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि  राज्यसरकार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल पुणेकरांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! आता प्रवेश प्रक्रिया राबवून याच वर्षी वैद्यकीय सुरुवात होईल, याचाही विशेष आनंद आहे.

           मुरलीधर मोहोळ, महापौर

0 Comments