अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियानाचे उद्घाटन
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व प्लास्टिक संकलन अभियान या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी दिली.
उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्य तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मोहितशेठ ढमाले, अनिल शेठ तांबे अध्यक्ष ग्रामविकास मंडळ ओतूर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, राजेंद्र डुंबरे संचालक ग्रामविकास मंडळ ओतूर तसेच प्रशांत डुंबरे उपसरपंच ग्रामपंचायत ओतूर आदी मान्यवर उपस्थित होते.
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय व ओतूर परिसरातून प्लास्टिकचे संकलन केले यामध्ये पाण्याच्या वापरलेल्या बाटल्या दुधाच्या पिशव्या औषधाच्या बाटल्या इत्यादी प्लास्टिक वस्तूंचे संकलन केले. प्लास्टिक संकलन हा उपक्रम इथून पुढे दर महिन्याच्या २२ तारखेला राबवला जाणार आहे. सदर जमा केलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन व रिसायकलिंग उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव अँड संदीप कदम, खजिनदार अँड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव प्रशासन ए एम जाधव आदी संस्था पदाधिकाऱ्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.एम शिंदे, उपप्राचार्य डॉ के डी सोनवणे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ बी एम शिंदे, हिंदी विभाग प्रमुख डॉ डी एम टिळेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, गणित विभाग प्रमुख प्रा एम व्ही देशमुख, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ एन एन उगले, एनसीसी विभाग प्रमुख डॉ एन एच हांडे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ यूपी पनेरू आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ ए एम बिबे, डॉ एन पी काळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष श्रम घेतले.