राष्ट्रवादी काँग्रेस उद्या शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत
: प्रवक्ते अंकुश काकडे यांची माहिती
पुणे : कोरोनाचा जोर कमी होत असल्याने राज्य सरकारने राज्य भरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले नव्हते. अखेर शनिवारी आयुक्तांनी आदेश काढले. त्यामुळे उद्यापासून 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कमी करण्यासाठी शाळा प्रवेशाच्या वेळी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येईल. अशी माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
: खासदार, आमदार, नगरसेवक करणार स्वागत
याबाबत काकडे यांनी सांगितले की पक्षाचे सर्वनगरसेवक , आमदार व खासदार वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. यामध्ये खासदार वंदना चव्हाण ऑर्चीड स्कूल बाणेरा, प्रशांत जगताप वानवडी, सुनील टिंगरे गेनबा मोझे स्कूल येरवडा, चेतन तुपे रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, दिपाली धुमाळ दिगंबर वाडी शाळा, अंकुश काकडे शिवाजी मराठा हायस्कूल, काका चव्हाण, संतोष चाकणकर बंडोजी चव्हाण विद्यालय धायरी, अप्पा रेणुसे चिंतामणी विद्यालय, उदय महाले, निलेश निकम मॉर्डन हायस्कूल, श्रीकांत पाटील राजेंद्र प्रसाद विद्यालय बोपोडी, दीपक मानकर प्रतिभा पवार विद्यालय एरंडवणा, दिलीप बराटे मामासाहेब विद्यालय वारजे, अश्विनी कदम,नितिन कदम विद्या विकास शाळा, बाबुराव चांदेरे कै. सोपानराव कटके विद्यालय बाणेर, सदानंद शेट्टी बाबूराव सणस कन्या विद्यालय मंगळवार पेठ, मच्छिंद्र उत्तेकर, सागर काकडे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, दत्तात्रय धनकवडे ज्ञानेश स्कूल, व्यंकटेश स्कूल धनकवडी, विशाल तांबे म न पा शाळा 91G,श्री रविन्द्र माळवदकर,शिवानी माळवदकर धनराज गिरजी शाळा,सायली वांजळे कै. गुलाबराव वांजळे शाळा अहिरे, वैशाली बनकर महात्मा फुले शाळा,रामचंद्र बनकर शाळा हडपसर,दीपक पोकळे, अजिंक्य पायगुडे रेणुका स्वरूप शाळा,गणेश नलावडे,नीलेश वरे हिरालाल सराफ प्रशाला.
तसेच सर्व नगरसेवक,कार्यकर्ते आपल्या भागातील शाळेत जाऊन विद्यर्थ्यांचे स्वागत करतील.
COMMENTS