समाविष्ट 23 गावातील जाहिरात फलकांना घ्यावी लागणार परवानगी
: 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे उद्देश
: 23 गावांचा समावेश
महाराष्ट्र शासनाकडील दि. ३०.०६.२०२१ रोजीच्या अधिसूचनेनुमार म्हाळुगे, सूस, बावधन-बुद्रुक,किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकबामला, मांजरी-बुद्रुक, न-हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मणमनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली अशा तेवीस तत्कालीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ठ करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीचे हद्दीत सुरू असलेल्या तमेच नव्याने सुरू करण्यात येणा-या जाहिरात फलक, दुकानावरील नामफलक व्यवसायांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २ ८४, ८५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ चे तरतुदीनुसार तसेच मशिनरी व साठा परवाना व्यवसायांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३१३ व ३७६ नुमार तरतुदी लागू होत आहेत. त्याकरीता सदर ब्यवसायांना पुणे महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील जाहिरात फलक, दुकानावरील नामफलक, मशिनरी व माठा परवाना व्यवसायाचे सर्वेक्षण करून सर्व संबंधीतांना नोटीम बजावण्यात यावी व परवानगी बाबतचे प्रस्ताव दि.२०.१०.२०२१ अखेर जमा करून परवानगी व शुल्क आकारणीची कार्यवाही करण्यात यावी. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
COMMENTS