तळजाई ते पर्वती ‘रोप वे’ करा
आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी
पुणे: तळजाई ते पर्वती असा ‘रोप वे’ करण्याची मागणी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची मंत्रालयात भेट घेऊन केली. मिसाळ म्हणाल्या, ‘राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्र सरकारला तातडीने प्रस्ताव पाठविल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन गडकरी यांनी या वेळी दिले.’
प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या
मिसाळ म्हणाल्या, ‘सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूलाच्या भूमिपूजनासाठी गडकरी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी विविध ठिकाणी ‘रोप वे’ची उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पर्वती आणि महाड श्री केदार जननी देवस्थान येथे ‘रोप वे’ करण्यासंदर्भात गडकरी यांना निवेदन दिले. दोन्ही प्रकल्पांचे सर्वेक्षण करुन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या.’
श्री क्षेत्र पर्वती ही टेकडी पुण्याच्या आग्नेय दिशेला आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन पर्वती हे नाव प्रचलित झाले. या ठिकाणी श्री देवदेवेश्वर संस्थान आणि कार्तिक स्वामी, विष्णू, विठ्ठल रुक्मिणी आदी देवतांची मंदिरे आहेत. सुमारे १०३ पायर्या चढून पर्वताई देवीच्या मंदिरात पोहचता येते. नवीन ‘रोप वे’ निर्मितीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांनाही दर्शन सुलभ होणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास आराखडा मंजूर झाला असून त्या अंतर्गत विविध विकासकामे सुरू असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
COMMENTS