Suvarnayug Sahakari Bank : सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने ; उपाध्यक्ष  नितीन राऊत

HomeपुणेCommerce

Suvarnayug Sahakari Bank : सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने ; उपाध्यक्ष नितीन राऊत

Ganesh Kumar Mule Mar 25, 2022 4:07 PM

Examination Fee : Standing Comitee : दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार
Pune : Hemant Rasne : हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांसाठी स्थायी समितीचा मोठा निर्णय 
PMPML : PMC : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोग फरकासाठी 6 कोटी  : स्थायी समितीने दिली मान्यता : मनपा कर्मचाऱ्यांना फरक कधी? 

सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
रासने बॅंकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन २००९ ते २०११ या कालावधी त्यांनी बॅंकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत बॅंकेने ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेटस’चे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले होते. रासने महापालिकेच्या स्थायी समितीचे सलग चार वेळा अध्यक्ष होते. महापालिकेला कोरोना काळातही विक्रमी महसूल उत्पन्न जमा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख म्हणूनही रासने कार्यरत आहेत.
अध्यक्षपदी निवड झाल्यावर रासने म्हणाले, ‘सुवर्णयुग बॅंकेची स्थापना २ ऑक्टोबर १९७३ रोजी झाली. सध्या बॅंकेच्या २२ शाखा आणि मुख्यालय आहे. बॅंकेचा व्यवसाय १३३५ कोटी रुपये असून, ८०९ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ५२६ कोटी रुपयांची कर्जे आहेत. येत्या आर्थिक वर्षात बॅंक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. नजिकच्या काळात बॅंकेचा शाखा विस्तार ५० पर्यंत आणि व्यवसाय पाच हजार कोटी रुपये करण्याचा निर्धार आहे. तसेच एनपीए शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बॅंकेच्या मुख्यालयाची स्वतंत्र आणि भव्य वास्तू साकारणार आहोत.’
नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन राऊत यांना बॅंकिंग कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शाहुराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0