Gurupournima: पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी  : गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या  शुभेच्छा

Homeपुणेcultural

Gurupournima: पी.डी. इ. ए. इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

Ganesh Kumar Mule Sep 18, 2021 6:48 AM

cartoon competition | “बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन
New Financial Year | नवीन आर्थिक वर्षात आपले स्वागत आहे! |  तयार व्हा | आजपासून हे नियम बदलले आहेत
Bageshwar Dham Sarkar in Dehu | बागेश्वर धाम सरकार यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी!

पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

: गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना दिल्या  शुभेच्छा

पुणे: आषाढी एकादशी नंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. पी.डी. इ. ए.  इंग्रजी माध्यम विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

: गुरु विषयीचा आदर व्यक्त

याप्रसंगी विद्यालयातील पूर्व प्राथमिक गटातील चिमुकल्यांनी श्लोक पठण केले. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व गोष्टी स्वरूपात सांगून गुरु विषयीचा आदर व्यक्त केला. इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कार्तिकी खिलारे हिने ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा’ या गाण्यावर नृत्य सादरीकरण केले. इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी संस्कृती भंडारी हिने गुरु शिष्य यावर एकपात्री नाट्यीकरण सादर केले.
  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरुणा गुंळजकर  मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका प्राजक्ता डफळ व पुनम सूर्यवंशी यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले.
  श्रावणी कोराळे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरुणा गुंळजकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केले आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0