पुण्यात जपली जाते राजकीय संस्कृती
: 25 वर्षांपासून जपली जाते परंपरा
पुणे: पुण्यात नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे राजकीय नेते गणेशउत्सवात मात्र एकत्र जमतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूका सुरू होण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चहा-पाण्यासाठी “काका हलवाई” येथे एकत्र जमण्याचा कार्यक्रम असतो. गेली २५ वर्ष ही परंपरा सुरुच आहे. यावर्षी मिरवणूक नसली तरी मात्र ही परंपरा जपली गेलीय.
: सर्व पक्षांचे नेते एकत्र
सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहर हे राजकीय संस्कृती जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. एरवी मात्र हे लोक एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात आघाडीवर असतात. मात्र दरवर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूका सुरू होण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चहा-पाण्यासाठी “काका हलवाई” येथे एकत्र जमण्याचा कार्यक्रम असतो. गेली २५ वर्ष ही परंपरा सुरुच आहे. पुणे तिथे काय उणे हेच मी मंडळी सिद्ध करून दाखवतात. कोविडमुळे सलग दोन वर्षे मिरवणुका बंद असल्यातरी या कार्यक्रमाची परंपरा मात्र सर्वांनी जपली आहे. या वर्षी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतद पाटील,माजी महापौर अंकुश काकडे, एनसीपी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दिपक मानकर, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे आदींसह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS