दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
पाटील इस्टेट,महात्मा गांधी वसाहत, मुळारोड,वाकडेवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे मुंबई रोड सोसायटी परिसरातील इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत नवनीत २१ अपेक्षित प्रश्नोत्तरसंच वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे ऍड स्वप्निल मारुती जोशी यांनी आयोजित केला असून कार्यक्रम गेले १८ वर्ष सातत्याने चालू आहे.
यंदाच्या वर्षी माजी महापौर अंकुश काकडे, नगरसेवक उदय महाले,बाळासाहेब दाभेकर,कस्टम आधिकारी प्रकाश रेणूसे,प्राचार्य अविनाश टाकावले, आशा साने, लावण्या शिंदे तसेच वस्तीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते. मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेलच, अशा शब्दात मुलांना प्रोत्साहन विजय आल्हाट यांनी सूत्रसंचालन करताना केले. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील ४५० विद्यार्थ्यांनी घेतला, कार्यक्रमाचे नियोजन महात्मा गांधी गणेशोत्सव मंडळ, चैतन्य मंडळ, जेतवन बुद्ध विहार यांनी केले.