उदघाटन कार्यक्रमात गोंधळ
:कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आहे. अखेर भाजपच्या काही वरिष्ठांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.
सिंहगड रस्त्यावरील अडीच किमी अंतर असलेल्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळा शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. तत्पूर्वी गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचें कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यानंतर कोनशिला अनावरण होत मंत्री आणि उपस्थित मान्यवर व्यासपीठावर जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हीआयपी प्रवेद्वारावरून आत जाण्यास गर्दी केली. पोलिसांनी आत गेलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले असता प्रवेशद्वारावरच पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना करताच भाजपच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी घालत असलेला गोंधळ सुरू असल्याचे दिसताच अनेक नागरिकांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला.
COMMENTS