Dr APJ Abdul Kalam | महान व्यक्तींच्या जडणघडणीत वाचनाचा फार मोठा वाटा”: प्रा.डॉ.वसंत गावडे

Homecultural

Dr APJ Abdul Kalam | महान व्यक्तींच्या जडणघडणीत वाचनाचा फार मोठा वाटा”: प्रा.डॉ.वसंत गावडे

Ganesh Kumar Mule Oct 15, 2024 8:48 PM

Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे
Dr. Vasant Gawde | राष्ट्रीय सेवा योजना ही भारतातील युवकांची सर्वात मोठी चळवळ |  डॉ वसंत गावडे
Marathi Language Day : Annasaheb Waghire College : अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा 

Dr APJ Abdul Kalam | महान व्यक्तींच्या जडणघडणीत वाचनाचा फार मोठा वाटा”: प्रा.डॉ.वसंत गावडे

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या,ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय विभाग( ज्ञान स्रोत केंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १५ ऑक्टोबर  रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे हे होते.

सदर प्रसंगी प्रा.डॉ.वसंत गावडे यांचे” मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले,” प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे वाचन करावे. वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात. करमणुकीसाठी, आनंदासाठी व ज्ञानप्राप्तीसाठी वाचन महत्त्वाचे आहे. नीतिमूल्य व संस्कारक्षम पिढी निर्मितीसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही. जीवनरुपी समुद्रात पुस्तके दीपग्रहाचे काम करतात. महान व्यक्तींच्या जडणघडणीत वाचनाचा फार मोठा वाटा असतो.” अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे म्हणाले,” वाचनाने माणूस बौद्धिक दृष्ट्या श्रीमंत होतो. सदग्रंथांचे वाचन म्हणजे उत्कर्षाचे साधन आहे. आजच्या समाज माध्यमाच्या बदलत्या काळात तरुण पिढी समोर ज्ञानाचा खजिना उपलब्ध झाला आहे. त्याचा त्यांनी सुयोग्य वापर करावा.”

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.निलेश हांडे,मा.श्री.प्रमोद थोरवे,.गणेश डुंबरे, निखिल काकडे, यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. रोहिणी मदने तर आभार डॉ.राजेश रसाळ यांनी मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0